बहुचर्चित ‘धूम ३’ आज प्रदर्शित झाला आहे. आयनॉक्स, पीव्हीआर, इरॉस आणि अन्य सगळ्या थेटर्समध्ये धूम आहे ती फक्त ‘धूम३’ चीच. भारतात साधारण ४ हजार स्क्रीनवर ‘धूम ३’ बघायला मिळणार आहे. तर विदेशात साधारण ७५० ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट जवळजवळ ४८०० स्क्रिन्सवर प्रदर्शित होणार आहे. ‘धूम ३’ ची तिकिट विक्री जोरात सुरू आहे. तिकीटांच्या विक्रीची शक्यता लक्षात घेतली तर ‘धूम ३’ च्या पहिल्याच दिवशी जवळजवळ ८० टक्क्यांपेक्षा जास्त सीट फूल झाल्याची शक्यता आहे.
अमर्त्य सेन यांची ‘ती’ टीका अमिरला मान्य
‘धूम ३’मधील ‘मलंग’ गाणे वादाच्या भोव-यात
कॉलेजची मुलेही बंक मारून खास चित्रपट पाहण्यासाठी गेले आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. हॉट अॅण्ड सेक्सी कतरिनाला तरुणाईने विचारलेदेखील नाही. आमिरपुढे इतर कलाकार त्यांची जादू चालविण्यात अयशस्वी ठरले आहेत. अभिषेक बच्चन आणि उदय चोप्राने तर सरळ अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घ्यावी, अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत. पटकथेपेक्षा प्रेक्षकांनी आमिरच्या अभिनयाची प्रशंसा करत हा चित्रपट वन टाइम असल्याचे म्हटले आहे. केवळ, आमिरला वेगळ्या रुपात आणि खलनायकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक तिकीटासाठी ९०० रुपये मोजण्यासाठी तयार झाले आहेत.
धूम-3 : आमिरचा अ‍ॅण्टी हिरो
अमिर म्हणतो ‘धूम ३’ कडून अपेक्षा नाही
दरम्यान, ‘धूम-३’ च्या यशासाठी अभिनेत्री कतरिना कैफने अजमेरमध्ये ख्वाज गरीब नवाज दर्ग्यात प्रार्थना केली. ‘धूम ३’ हा ‘चेन्नई एक्स्प्रेस’  आणि ‘क्रिश ३’ चा रेकॉर्ड मोडण्यात यशस्वी ठरतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
पाहाः ‘धूम ३’च्या टायटल ट्रॅकचा ‘अरेबिक मेकओव्हर’