News Flash

अखेर सलमानच्या ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’चा ट्रेलर प्रदर्शित

पाहा ट्रेलर

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा ‘राधे-युवर मोस्ट वॉंटेड भाई’ या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. सलमानचे चाहते या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतिक्षा अनेक दिवसांपासून करत होते. आता प्रतिक्षा संपली असून ‘राधे’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. सलमानने सोशल मीडियावर ‘राधे’चा ट्रेलर शेअर केला आहे.

सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरून ‘राधे’चा ट्रेलर शेअर केला आहे. या ट्रेलरमध्ये सलमानची एक वेगळीच झलक पाहायला मिळतं आहे. मुंबईत गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिस अधिकारी असलेला राधे म्हणजेच भाईजान सलमान मुंबईतील गुन्हेगांरांच्या मुसक्या आवळताना दिसणार आहे. राधे हा एक स्पेशलिस्ट असून तो त्याच्या पद्धतीने काम करतो. ट्रेलरमध्ये जॅकी श्रॉफ ,रणदीप हूडा आणि दिशा पटानीची झलक पाहायला मिळत आहे. ‘वॉंटेड’ या चित्रपटातील राधेचं हे २.० व्हर्जन असल्याचे चित्रपटातून दिसतं आहे. तर सलमान आणि दिशामधील केमिस्ट्री ही प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच उतरणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

आणखी वाचा- आरारारारा… खतरनाक; ‘राधे’च्या पोस्टरमध्ये सलमानसोबत झळकले प्रवीण तरडे

या चित्रपटात सलमानसोबत मुख्य भूमिकेत अभिनेता रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफ, प्रवीण तरडे आणि अभिनेत्री दिशा पटानी दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभू देवाने केले आहे. हा चित्रपट १३ मे रोजी चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तर, करोनाचे निर्बंध लागु असणाऱ्या ठिकाणी हा चित्रपट प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल . एवढंच नाही तर चित्रपट ४० देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2021 11:50 am

Web Title: finally salman khan s radhe your most wanted bhai s trailer out film dcp 98
Next Stories
1 “राजकीय वर्गाचे हात रक्ताने माखलेले आहेत….”,अभिनेत्री पूजा भटचा सरकारवर आरोप
2 ‘दोस्ताना 2’साठी करणने मागितली अक्षयची मदत, अक्षय साकारणार मुख्य भूमिका?
3 आरारारारा… खतरनाक; ‘राधे’च्या पोस्टरमध्ये सलमानसोबत झळकले प्रवीण तरडे
Just Now!
X