News Flash

सलमान खानच्या अंगरक्षकावर गुन्हा दाखल

शेराची स्वत:ची ‘टायगर सिक्युरिटी’ नावाची कंपनी आहे

सलमान खान, शेरा

बॉलिवूड अभिनेते त्यांच्या अंगरक्षकांमुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात येतात. कलाकारांभोवती नेहमीच घोळका करुन असणारे हे अंगरक्षक कधीकधी या कलाकारांनाही अडचणीत टाकतात. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार अभिनेता सलमान खानचा अंगरक्षक शेरा, ह्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीएन नगर पोलिस स्थानकात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संविधानातील कलम ३२३, ३२६, ७२५/ १६, ५०४ आणि ५०६ अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी घडलेल्या एका प्रसंगामध्ये शेरा आणि अत्तर उमर कुरेशी या इसमामध्ये काही कारणास्तव बाचाबाची झाली होती, अशी माहिती डीएन नगर पोलिस स्थानकातील वरिष्ठ पोलीस अधिकारी धनाजी नलावडे यांनी एका वृत्तसंस्थेला दिली. शेरा कुरेशीला मारण्यासाठी धावून गेला असता कुरेशीने पोलिस स्थानकाची वाट धरत त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. लिंक रोड येथून जात असताना कुरेशीने शेराला पाहिले आणि त्याची गाडी थांबवली. अशी माहिती मुंबई पोलिसांच्या प्रवक्त्यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. दरम्यान त्यानंतर कुरेशीला एक फोन आल्यानंतर शेरा आणि त्याच्यामध्ये बाचाबाची झाली. याच प्रकरणी शेरावर मारहाण आणि घटनास्थळावरुन पळ काढण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलमान खान जितका चर्चेत असतो तितकीच त्याचा अंगरक्षक शेरासुद्धा अनेकदा चर्चेत असतो. शेरा गेल्या अठरा वर्षांपासून सलमानसाठी अंगरक्षकाचे काम करत आहे. सलमानच्या सावलीप्रमाणे तो त्याच्यासोबतच वावरत असतो. सलमानही शेराला आपल्या घरातील सदस्याप्रमाणेच मानतो. सलमान शेराचा मुलगा टायगरला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार असल्याची सध्या चर्चा आहे. शेराची स्वत:ची ‘टायगर सिक्युरिटी’ नावाची कंपनी असून, तो सेलिब्रिटींना सुरक्षा पुरवतो. तुर्तास शेरावर दाखल केलेल्या एका गुन्ह्यामुळे सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 12:58 pm

Web Title: fir filed against salman khans bodygaurd
Next Stories
1 ..या पुरस्कारासाठी कंगनाने दिले हृतिकच्या नावाला प्राधान्य
2 दिवाळीच्या निमित्ताने हिमांशूने दिली अमृताला खास भेट
3 बहुचर्चित ‘काबिल’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
Just Now!
X