08 March 2021

News Flash

मुलीला पोलिओचा डोस देण्यास नकार, फवाद खानविरोधात एफआयआर दाखल

पोलिओ डोस देण्यासाठी कर्मचारी फवाद खानच्या निवासस्थानी पोहोचले होते

बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये झळकलेला पाकिस्तानी अभिनेता फवाद खान सध्या चर्चेत आहे. फवाद खानची पत्नी सदफ खानने आपल्या मुलीला पोलिओचा डोस देण्यास नकार दिला होता. यामुळे फवाद खानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिओचा डोस देणारी टीम फवाद खानच्या घरी पोहोचली होती. यावेळी त्याच्या पत्नीने मुलीला डोस देण्यास नकार दिला. इतकंच नाही तर कर्मचाऱ्यांना अयोग्य वागणूक दिल्याचाही आरोप आहे.

यानंतर पोलिओ टीमने लाहोर पोलिसांकडे लेखी तक्रार केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिओ टीम फैसल शहरातील फवाद खानच्या निवासस्थानी पोहोचली होती. मात्र त्याच्या पत्नीने मुलीला डोस देण्यास स्पष्ट नकार दिला.

पाकिस्तानमध्ये पोलिओ आजाराची गंभीर समस्या आहे. पोलिओ डोस न दिल्यास अपंगत्व येण्याची भीती असते. पोलिओशी लढा देण्यासाठी मोहीम सुरु करण्यात आली असून घरोघरी जाऊन लहान मुलांना पोलिओ डोस दिला जात आहे.

फवाद खानने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. फवाद खानने सोनम कपूरसोबत ‘खुबसूरत’, आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘कपूर अॅण्ड सन्स’ तसंच अनुष्का शर्मासोबत ‘ए दिल है मुश्कील’ चित्रपटात काम केलं आहे. पाकिस्तान चित्रपटसृष्टीत फवाद खान सुपरस्टार आहे. त्यामुळेच या घटनेमुळे तो अडचणीत आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 1:07 pm

Web Title: fir registered against fawad khan after wife denies anti polio drop to child
Next Stories
1 कपिल-सुनीलचा वाद मिटविण्यासाठी सलमानचा दुसऱ्यांदा प्रयत्न
2 ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
3 सिद्धूंच्या खुर्चीवर अर्चना विराजमान, ‘द कपिल शर्मा शो’ च्या चित्रीकरणाला सुरूवात
Just Now!
X