28 September 2020

News Flash

वादग्रस्त पोस्ट- गायिका हार्ड कौर विरोधात खटला दाखल

वकिल शशांक शेखर त्रिपाठी यांनी नोंदवली तक्रार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात वादग्रस्त विधान करणारी पंजाबी गायिका हार्ड कौर विरोधात खटला दाखल करण्यात आला आहे.

२६/११ व पुलवामासह देशात होणाऱ्या सर्व दहशतवादी हल्ल्यांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार आहे, असा खळबळजनक आरोप हार्ड कौरने केला होता. इन्स्टाग्राम अकाउंटवर तिने यासंदर्भात भलीमोठी पोस्टच लिहिली होती. हार्डकौरच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर अनेकांनी तिच्यावर टीका केली.

आता याप्रकरणी वारणासी पोलिसांनी हार्ड कौर विरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे. वकिल शशांक शेखर त्रिपाठी यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या पोस्टमुळे सामान्य माणसांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे तक्ररीत म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2019 2:35 pm

Web Title: fir registered in varanasi against singer hard kaur for her comments msr87
Next Stories
1 अमेरिकेला जाणे स्वप्नच राहणार; H1B व्हिसावर मर्यादा येणार
2 दुबई: भारतीयानं हाल हाल करून केली आईची हत्या
3 खासदार नुसरत जहां टर्कीमध्ये अडकली विवाहबंधनात, शपथविधीला गैरहजर
Just Now!
X