हॉलिवूड अभिनेता ह्यू जॅकमनचे सध्या दिवस चांगले नाहीत असेच म्हणावे लागले. काही दिवसांपूर्वी जॅकमन त्वचेच्या कर्करोगावर उपचार सुरु झाले आहेत. या उपचारातून बाहेर येत नाही तोच आता त्याच्या सिनेमाच्या सेटवर आग लागली. या आगीमुळे एक मोठी घटना घडता घडता वाचली.

[jwplayer Z8WAa5MH]

Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे
usha mehta congress radio
ब्रिटिशांना आपल्या आवाजाने ‘सळो की पळो’ करून सोडणार्‍या उषा मेहतांची कहाणी

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार ‘द ग्रेटेस्ट शोमॅन’च्या या सिनेमाचे चित्रिकरण सुरु होते. चित्रिकरणावेळी एका व्यासपिठावर आग लागली गेली. या सिनेमात ह्यू जॅकमन आणि जॅक एफ्रन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जेव्हा ही आग लागली तेव्हा सिनेमाशी संबंधीत कलाकार आणि तंत्रज्ञ एका नाट्यमय दृश्याचे चित्रिकरण करत होते. या सिनेमाची निर्मिती करणारी २०एथ सेंच्युरी फॉक्सने एक पत्रक प्रसिद्ध केले होते. या पत्रकात त्यांनी म्हटले होते की ‘द ग्रेटेस्ट शोमॅन’ या सिनेमाच्या सेटवर लहान आग लागली. आगेवर त्वरीत नियंत्रण ठेवण्यात आले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. प्रमुख कलाकार त्यांचे काम संपवून गेले होते.

तर एका वृत्तपत्रात आलेल्या वृत्तानुसार, जेव्हा सेटवर आग लागली तेव्हा साधारणतः १५० लोक उपस्थित होते. आग लागण्याचे कारण हे चित्रिकरणाच्या दृश्यात जी आग दाखवली जात होती ती अधिक भडक करण्यासाठी सहा मोठ मोठ्या लाइट्स वापरण्यात आल्या होत्या. या लाइट्सपैकी काही लाइट्स या इमारतीच्या छतावरुन खाली पडल्या, ज्यामुळे आग लागली.

[jwplayer NwBuiPhd]