10 December 2019

News Flash

‘कूली नंबर १’च्या सेटवर लागली आग

दरम्यान चित्रपटाच्या सेटवर १५ कामगार उपस्थित होते

अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री सारा अली खानचा आगामी चित्रपट ‘कूली नंबर १’ च्या सेटवर आग लागल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री १२:३०चा सुमारास ही आग लागली. सुदैवाने या आगीमध्ये जीवितहानी झालेली नाही. चित्रपटाच्या सेटच्या नुकसानीबाबत अद्याप कोणतीही माहीती समोर आलेली नाही.

दरम्यान चित्रपटाच्या सेटवर १५ कामगार उपस्थित होते. त्यांनी आग लागल्याचे कळताच अग्निशमन दलाला माहिती केली. अग्निशमन दलाने तातडीने सेटवर धाव घेतली. ही आग विझवण्यात आली. पण ही आग कशामुळे लागली हे कळलेले नाही.

‘कुली नंबर १’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक डेविड धनव करत आहे. गेल्या महिन्यात चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. या चित्रपटात वरुण धवन आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीचे चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते.

नव्वदच्या दशकात गोविंदाच्या ‘कुली नंबर १’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. विनोदी चित्रपटांची एक लाटच त्याकाळी आली आणि गोविंदा रातोरात सुपरस्टार विनोदी अभिनेता म्हणून लोकप्रिय झाला. त्यानंतर आपल्या समकालिनांप्रमाणे पुन्हा एकदा चित्रपटात नशीब आजमावून पाहण्याचा गोविंदाने केलेला प्रयत्न फसला असला तरी त्याच्या चित्रपटांची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. त्यामुळे गोविंदाच्या या चित्रपटांचे निर्माते वाशू भगनानी यांनी गोविंदाच्या गाजलेल्या चित्रपटापैकी एक म्हणजे ‘कुली नंबर १’चा रिमेक करण्याचा निर्णय घेतला.

First Published on September 11, 2019 3:25 pm

Web Title: fire on coolie number 1 movie set avb 95
Just Now!
X