बॉलीवूड संगीतकार आणि रॅपर हनी सिंग द एक्स्पोज चित्रपटाने अभिनयक्षेत्रात प्रवेश करत आहे. ‘द एक्सपोज’ हा चित्रपट ६०च्या दशकावर आधारित असून, याच्या ट्रेलरवरून हा चित्रपट इच्छा, घोटाळे आणि खूनावर आधारित असल्याचे कळते.
चित्रपटाची कथा दोन सुपरस्टार्सवर आधारित आहे. या भूमिका हिमेश रेशमिया आणि हनी सिंग यांनी साकारल्या आहेत. सदर चित्रपटाला संगीत हिमेश रेशमियाने स्वतः दिले आहे. हनी सिंग चित्रपटात आहे आणि रॅपसाँग नसणार अस तर शक्यच होणार नाही. हनी सिंगने जॅझ साँग गायले आहे. यात इरफान खानचीही प्रमुख भूमिका असून, झोया फरोझ, सोनाली राऊत आणि आदिल हुसेन यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका केल्या आहेत.

महत्वाचं म्हणजे चित्रपटातील दोन्ही मुख्य अभिनेत्रींनी जुन्या काळातील अभिनेत्री परवीन बाबी आणि झिनत अमान यांची नक्कल केली आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला ‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटातील झिनत अमानप्रमाणे सोनाली राऊतने पांढ-या रंगाची पारदर्शक साडी परिधान केली आहे. तर झोया अफ्रोझीने परवीन बाबीच्या स्टाइलची नक्कल केली आहे.

अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित, विपीन रेशमियाची निर्मिती असलेला ‘द एक्स्पोज’ २३ मे रोजी प्रदर्शित होत आहे.