12 July 2020

News Flash

पाहा: बाजीराव मस्तानीचा फर्स्ट लूक

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित करत असलेल्या या ऐतिहासिक चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक मोहवून टाकणारा आहे.

| July 15, 2015 12:32 pm

बॉलीवूडच्या बहुचर्चित ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक बुधवारी प्रदर्शित झाला. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित करत असलेल्या या ऐतिहासिक चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक मोहवून टाकणारा आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटासाठी रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण प्रचंड मेहनत घेत असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत होत्या. त्यामुळे या चित्रपटाची झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. या चित्रपटाचे निर्माते असलेल्या इरॉस कंपनीच्या ट्विटर अकाऊंटवरून ऐतिहासिक पोशाखातील कलाकारांची छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. अभिनेता रणवीर सिंगनेही याबद्दल चाहत्यांशी ट्विटरवरून संवाद साधला . या चित्रपटासाठी रणवीरने शारीरीक मेहनतीबरोबरच भूमिकेचा अभ्यास करण्यावर लक्ष केंद्रित केले होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2015 12:32 pm

Web Title: first look of bajirao mastani
Next Stories
1 छोटय़ा पडद्यावर ‘रामा’चे पुनरागमन!
2 पाहा सलमान खान निर्मित ‘हीरो’चा ट्रेलर, सूरज पांचोली आणि अथिया शेट्टीचे पदार्पण
3 अमजद खानच्या मुलाच्या पुस्तकाचे बिग बींच्या हस्ते प्रकाशन
Just Now!
X