News Flash

आपण यांना ओळखलंत का?

नव्या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी ते सज्ज...

छाया सौजन्य- शिल्पा शिंदे / इन्स्टाग्राम

‘अंगुरी भाभी’ म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिलेल्या अभिनेत्री शिल्पा शिंदेने कलाविश्वात तिची अशी एक वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. ‘बिग बॉस’च्या ११ व्या पर्वाचं विजेतेपद मिळवल्यानंतर तिने पुन्हा एकदा आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे. सध्या शिल्पाने कॉमेडियन सुनील ग्रोवरसोबत हातमिळवणी केली असून, ‘दे दना दन’ या वेब शोमधून हे दोघंही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या वेब शोचा फर्स्ट लूक नुकताच शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला.

सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोमध्ये शिल्पा आणि सुनीलचा लूक लक्षवेधी ठरत आहे. त्यांच्या या लूकमध्ये एक प्रकारचा विनोदी बाजही पाहायला मिळतो. त्यामुळे आता हे दोघंही प्रेक्षकांना हसवण्यात यशस्वी ठरतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ‘येत्या काळात सर्वांच्याच चेहऱ्यांवर आम्ही दोघंही हसू आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्यात आम्हाला यश मिळेल, अशी मला आशा आहे’, असं कॅप्शनही तिने या पोस्टसोबत लिहिलं.

‘त्या’ तिघांमुळे माझ्या आयुष्याची कहाणीच बदलली- सनी लिओनी

वेब शोचं वाढतं प्रस्थ आणि संपूर्ण जग पाहता शिल्पा आणि सुनीलसाठी हे एक आव्हान असणार आहे. पण, या दोघांचीही लोकप्रियता नजरेत घेतली असता त्यांच्या कार्यक्रमाची सर्व चक्र सुरळीत चालली तर यश त्यांच्यापासून दूर नाही हेसुद्धा नाकारता येत नाही. जिओ टीव्ही अॅपवर आयपीएल सामन्यांदरम्यान शुक्रवार ते रविवारदरम्यान प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात अली असगर, सुगंधा मिश्रा, परेश गणात्रा हे कलाकारही झळकणार आहेत. त्यामुळे क्रिकेटला मिळणारा हा विनोदी तडका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2018 8:44 am

Web Title: first look of comedian sunil grover and television actress shilpa shinde on the sets of their cricket show
Next Stories
1 रामलीलामध्ये सीताची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या रवि किशनचे असे बदलले नशीब
2 पठडीबाहेरच्या सिनेमांनी एप्रिल ‘फुल्ल’
3 ‘पत्थरबाजी ठीक, पर तिरंगा जलाना बर्दाश्त नहीं’, ‘बागी २’ चे हे दमदार संवाद ऐकले का?
Just Now!
X