News Flash

Aapla Manus First Look: ‘हा सैतान बाटलीत मावनार नाय’

'आपला मानूस' चित्रपटात अजय देवगण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत

nana patekar, aapla manus
'आपला मानूस' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘ती सध्या काय करतेय’ अशा दमदार चित्रपटांनंतर आता दिग्दर्शक सतीश राजवाडे ‘आपला मानूस’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे. नाना पाटेकर आणि अजय देवगणने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा फर्स्ट लूक पोस्ट केला आहे.

मुसळधार पावसात नाना बाईक चालवताना या पोस्टरमध्ये दिसत आहेत. त्यांची भेदक नजर यामध्ये विशेष लक्ष वेधून घेते. त्यासोबतच पोस्टरवरील ‘हा सैतान बाटलीत मावनात नाय’ ही टॅगलाइन नानांच्या भूमिकेविषयी उत्सुकता वाढवत आहे. नवऱ्याच्या वडिलांसोबत राहणाऱ्या, शहरी जीवनशैलीच्या दबावाचा सामना करणाऱ्या आणि नातेसंबंधांची गुंतागुंत हाताळणाऱ्या एका तरुण दाम्पत्याची कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.

नानांसोबतच सुमीत राघवन, इरावती हर्षे यांच्याही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेता अजय देवगण यामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भुमिकेत पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शत होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2017 12:35 pm

Web Title: first look of marathi film aapla manus nana patekar ajay devgn satish rajwade
Next Stories
1 आईच्या भूमिका साकारण्यास माधुरीचा नकार?
2 TOP 10 NEWS : सलमानने दत्तक घेतलेल्या आजींपासून माधुरीवरील दबावापर्यंत
3 ‘या’ प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडीने घटस्फोटासाठी दाखल केला अर्ज
Just Now!
X