आशयघनता आणि व्यावसायिक गणितं याची उत्तम सांगड घालीत यशाच्या पायऱ्या चढणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीचा आलेख चढता आणि गौरवशाली राहिला आहे. सशक्त विषयही उत्तम सादरीकरणातून मांडण्याची खबरदारी नव्या फळीचे निर्माते दिग्दर्शक घेताना दिसताहेत. अनेक कॉर्पोरेट कंपन्यादेखील मराठी चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी उत्साही आहेत.

मराठी चित्रपटांचा आशय-विषय, तांत्रिक कौशल्य आणि निर्मितीमूल्य पाहून मराठी चित्रपट निर्मितीसाठी अनेकजण स्वारस्य दाखवित असतानाच ‘साईबाबा स्टुडिओज’ आणि ‘समृद्धी सिनेवर्ल्ड’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ हा पहिला मराठी हॉलिवूड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेतील लॉस एंजलिस येथे होणार आहे. या निमित्ताने एक मानाचा तुरा मराठी चित्रपटांच्या शिरपेचात रोवला जाणार आहे.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

टेलीव्हिजन विश्वात अनेक दर्जेदार कलात्मक कार्यक्रम देणारी ‘साईबाबा स्टुडिओज’ ही निर्मितीसंस्था या निमित्ताने मराठीत पहिले पाऊल टाकणार आहे. तसेच ‘मला आई व्हायचंय’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ आणि हिंदीतला ‘हेमलकसा’ असे संवेदनशील विषय रुपेरी पडद्यावर आणणाऱ्या दिग्दर्शिका समृद्धी पोरे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत.  या तीन चित्रपटाच्या यशानंतर काहीतरी नवीन करण्याचा समृद्धी यांचा मानस होता. तसेच हिंदीत एकाहून एक सरस कार्यक्रमांची निर्मिती केल्यानंतर मराठीत आपलं वेगळपण दाखवून देण्यासाठी ‘साईबाबा स्टुडिओज’चे शिवकुमार उत्सुक होते. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या चित्रपटाच्या निमित्ताने वेगळी वाट चोखाळत प्रेक्षकांना नवं काहीतरी देण्याच्या उद्देशाने हे दोघेजण एकत्र आले आहेत.

“एक चांगली निर्मातीसंस्था या नात्याने प्रेक्षकांना आम्ही काय देत आहोत हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी माझ्या मनात आदर असून या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीसाठी योगदान देता येईल, असं शिवकुमार यांनी सांगितलं. तर चाकोरीबाहेर जाऊन प्रेक्षकांना काहीतरी हटके देण्यातला आनंद दिग्दर्शिका समृद्धी पोरे यांनी व्यक्त केला.

‘साईबाबा स्टुडिओज’ निर्मिती संस्थेची कामगिरी व समृद्धी पोरे यांच्या दिग्दर्शकीय कौशल्यातून एक सकस कलाकृती लवकरच मराठी प्रेक्षकांना पहायला मिळेल हे नक्की. या चित्रपटाच्या विषयाची तसेच गुलदस्त्यात असणाऱ्या कलाकारांची नावे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.