News Flash

मराठी वेब सिनेमा ‘संतुर्की’चा ट्रेलर प्रदर्शित

'संत्या आणि सुरकी' या लोकप्रिय जोडीची प्रेमकथा

सध्या फिल्मी जगात अनेक प्रसिद्ध कलाकारांच्या जोड्या चर्चेत आहेत, त्यांच्या जोडीपेक्षा त्यांना संबोधणारी नावेच विशेष चर्चेत आहेत जसे की ,विराट आणि अनुष्काची जोडी म्हणजे ‘वीरूष्का’, दीपिका-रणवीर म्हणजे ‘दीपवीर’, प्रियांका – निक म्हणजे ‘प्रिक’ आणि बरेच काही…. त्याचप्रमाणे मराठीमध्येदेखील एक जोडी प्रसिद्धा होत आहे जी आहे ‘संत्या आणि सुर्कीची जोडी’ म्हणजेच ‘संतुर्कीची’!

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली सुप्रसिद्ध मराठी वेब सीरीज ‘गावाकडच्या गोष्टी’ने एक नवं वळण घेतलं आहे. वेब सीरिजचे दोन पर्व जरी संपले असले तरी हा पूर्णविराम नाही. कोरी पाटी प्रोडक्शनच्या गावाकडच्या गोष्टीमधील लोकप्रिय जोडी ‘संत्या-सुरकी’ यांची प्रेमकथा प्रेक्षकांना नितीन पवार दिग्दर्शित ‘संतुर्की’ या वेब सिनेमाद्वारे पाहता येणार आहे. मराठी मनोरंजन जगातील हा पहिलावहिला प्रयोग असून ‘व्हॅलेंटाईन डे’चं औचित्य साधून टीजर प्रदर्शित केला होता. टीजरला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर सर्वत्र चर्चा रंगली ती फक्त ‘संतुर्कीची’! संतुर्की या वेब सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

साधी आणि सर्वांना आपलीच वाटावी अशी कहाणी असलेली गावाकडच्या गोष्टी या वेब सीरीजचे दोन यशस्वी पर्व झाले. गावा-शहरांपासून अगदी सातासमुद्रापार या वेब सीरिजची चर्चा झाली. सातारा जिल्ह्यातील केळेवाडी गावात जन्मलेल्या वेब सीरिजला जगभरातून प्रेम मिळालं. या वेब सीरिजमधील ‘संत्या आणि सुरकी’ हे पात्र सर्वाधिक लोकप्रिय झालं. दोघांच एकमेकांवर जीवापाड प्रेम असूनही काही कारणास्त्व त्यांचं लग्न होऊ शकल नाही. लग्न होऊन गेलेली सुरकी पुन्हा संतोष समोर येते तेव्हा त्याची होणारी तगमग किंवा तिच्या मुलाने “मामा” म्हटल्यावर होणारी गंमत सगळ्यांना भावली. पण याच सोबत सगळ्यांना वेध लागले की इतकं जीवापाड प्रेम करणारी ही दोघं एकमेकांपासून वेगळी का झाली.? याचंच उत्तर या कोरी पाटी प्रोडक्शनच्या संतुर्की सिनेमात आहे.

संतुर्की या वेब सिनेमामध्ये संतोष राजेमहाडीक, रश्मी साळवी हे मुख्य भूमिकेत दिसणार असून के.टी.पवार, तृप्ती शेडगे, शुभम काळोलीकर, समाधान पिंपळे हे कलाकार देखील असणार आहे. सिनेमाचे लेखन व दिग्दर्शन नितीन पवार यांनी केल आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2019 10:17 am

Web Title: first marathi web cinema santurki trailer released
Next Stories
1 पाहा अंगावर काटा आणणारा ‘आर्टिकल १५’चा ट्रेलर
2 रोहित शेट्टीच्या या चित्रपटात एकत्र येणार ‘सूर्यवंशी’, ‘सिम्बा’ आणि ‘सिंगम’?
3 बिग बींसोबत काम करणार मराठी कलाकारांची फौज
Just Now!
X