News Flash

प्रिन्स हॅरी- मेगनला प्रियांका चोप्राने दिल्या शुभेच्छा

मेगन आणि प्रिन्स फारच आनंदात दिसत होते

प्रिन्स हॅरी, मेगन

ब्रिटनचा राजकुमार प्रिन्स हॅरी आणि अभिनेत्री मेगन मार्कल यांच्याबद्दल सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. या दोघांनी आपल्या साखरपुड्याची बातमी दिल्यानंतर त्यांच्याव शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पुढच्या हे दोघे विवाहबंधनात अडकणार असल्याचेही म्हटले जातेय. या नव्या सेलिब्रिटी जोडप्याला शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राचाही समावेश आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगनच्या साखरपुड्याचे वृत्त कळताच प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या दोघांचाही फोटो पोस्ट करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

मेगन प्रियांकाची खूप चांगली मैत्रीण असून, तिच्या आयुष्यात आलेल्या या वळणामुळे ‘देसी गर्ल’ फारच आनंदात आहे. ‘मेगन तू कायम अशीच हसत राहा, आयुष्यात तुला सर्व सुख मिळो’, असे म्हणत प्रियांकाने तिला शुभेच्छा दिल्या. सोमवारी हॅरी आणि मेगन यांचा साखरपुडा झाल्याचे ब्रिटनच्या राजघराण्यातर्फे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर खुद्द प्रिन्स हॅरी आणि मेगनने प्रसारमाध्यमांसमोर येत आपल्या नात्याची कबुली दिली. यावेळी अनेकांचेच लक्ष मेगनच्या अंगठीवर स्थिरावले होते. ‘माझ्यासाठी हा सुखद धक्काच होता’, असे मेगनने सांगितले.

वाचा : जाणून घ्या मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा ‘डाएट प्लॅन’

हॅरी आणि मेगनच्या लग्नाच्या निमित्ताने पुन्हा एकदा साऱ्या जगाला ब्रिटनच्या राजघराण्यातील शाही विवाह सोहळ्याचा थाट पाहता येणार आहे. पण, त्यासाठी २०१८ ची वाट पाहावी लागणार हेसुद्धा तितकेच खरे. सध्या मेगन आणि हॅरी राजघराण्यातील नियमांप्रमाणे विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. मेगनसोबत नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी हॅरीला ब्रिटनच्या राणीचीही परवानगी घ्यावी लागली होती. राणीने या नात्यासाठी हॅरीला परवानगी दिल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 12:24 pm

Web Title: first photos of newly engaged prince harry and meghan markle bff priyanka chopra has the cutest message for them
Next Stories
1 दीपिकाला कपिलचा पाठिंबा
2 सनीच्या ‘तेरा इंतजार’ टीमने जिंकली ‘बार्बी’ कंपनीविरोधातील याचिका
3 जॉनी लिव्हर यांना आजही या गोष्टीचे दुःख..
Just Now!
X