18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

कुणाल- सोहाच्या मुलीचा पहिला फोटो पाहिलात का?

कुणाल आणि सोहाने आपल्या मुलीचे नाव इनाया नॉमी खेमू असे ठेवले

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 2, 2017 5:21 PM

अभिनेत्री सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांच्या घरी शुक्रवारी २९ सप्टेंबरला तान्हुलीचं आगमन झालं. ट्विटरच्या माध्यमातून कुणालने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. कुणाल आणि सोहाने आपल्या मुलीचे नाव इनाया नॉमी खेमू असे ठेवले. आज हे दोघे आपल्या चिमुकलीसोबत रूग्णालयातून घरी परतत असताना प्रसारमाध्यमांनी इनायाचे छायाचित्र टिपण्याचा प्रयत्न केला.

२७ सप्टेंबरला सोहाला रुग्णालयात नेण्यात आले. ‘मिड- डे’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ‘गोलमाल अगेन’ सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी कुणाल फार घाईत होता. तो हा कार्यक्रम लवकर संपवून सोहाला रुग्णालयात घेऊन गेला होता.

जुलै २०१४ मध्ये कुणालने पॅरिसमध्ये सोहाला प्रपोज केलं होतं. त्यानंतर जानेवारी २०१५ मध्ये दोघांनी लग्न केलं. सोहा गरोदर असल्याची बातमीही कुणालने ट्विटरद्वारे चाहत्यांना दिली होती. डिसेंबर महिन्यात तैमुरचा जन्म आणि आता सोहाने दिलेल्या या गूड न्यूजमुळे खान कुटुंबाचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

वहिनी करिना कपूर खानसारखेच सोहाची प्रेग्नेंसी स्टाइलही चर्चेचा विषय ठरली होती. सोहा सोशल मीडियावर फार सक्रिय असून प्रेग्नेंसी दरम्यानचे आपले अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.

बेबी शॉवरच्या कार्यक्रमात ती फार सुंदर दिसत होती. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील सोहाच्या मित्र- मैत्रिणींनी आवर्जून हजेरी लावली होती. पण या सगळ्यात तैमुर आणि तिचा फोटो फार चर्चेचा विषय ठरला होता.

First Published on October 2, 2017 5:21 pm

Web Title: first photos of soha ali khan kunal khemus daughter inaaya naumi khemu out