News Flash

Manikarnika first poster : खूब लडी मर्दानी झांसी की राणी!

झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून कंगना राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे.

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत हिच्या आगामी ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ या ऐतिहासिक चित्रपटाचा पहिला पोस्टर ‘स्वातंत्र्य दिना’निमित्त प्रदर्शित करण्यात आला. झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून यात कंगना राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारत आहे.

कंगनासाठी हा चित्रपट खूपच महत्त्वाचा असणार आहे.  मुलाला पाठीला बांधून रणांगणात इंग्रजांविरुद्ध उभ्या ठाकलेल्या मर्दानी झाशीच्या राणीचं हे रुप तिनं देशासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण करून देणारं आहे. झी स्टुडिओची प्रमुख निर्मिती असलेला हा बहुप्रतिक्षित चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होत आहे. २५ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील ब्राह्मण समुहाने ऐतिहासिक तथ्यांसोबत छेडछाड केल्याचा आरोप या चित्रपटावर केला होता, त्यामुळे हा चित्रपट वादात सापडला होता.

https://twitter.com/ZeeStudios_/status/1029568298931892224

या वर्षाअखेर हा चित्रपट प्रदर्शित होणार होता मात्र काही कारणानं याचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं. या चित्रपटात कंगनाबरोबरच अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी यांसारखे प्रसिद्ध मराठी चेहरेही दिसणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 9:36 am

Web Title: first poster of kangana ranaut manikarnika the queen of jhansi
Next Stories
1 ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ची ‘चि. सौ. कां. रंगभूमी’वर मोहोर
2 अँटी- एजिंग क्रीम जाहिरातीवरून ट्रोल करणाऱ्यांना मीराचं उत्तर
3 जिम म्हणतो, खलनायकाची भूमिका नको रे बाबा!
Just Now!
X