18 January 2018

News Flash

कपिल शर्माच्या ‘फिरंगी’चं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

आता कोणत्या भूमिकेत दिसणार अवलिया कपिल?

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 28, 2017 8:34 PM

छाया सौजन्य- ट्विटर

बंगळुरु येथे उपचारासाठी गेलेला विनोदवीर कपिल शर्मा वेळे आधीच परतला. काही दिवसांपूर्वीच परतलेल्या कपिलने पुन्हा एकदा नव्या जोमाने त्याच्या कामाची सुरुवात केली असून, आगामी ‘फिरंगी’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी तो तयारीला लागला आहे. नुकतंच त्याच्या या चित्रपटाचं पोस्टर सर्वांच्या भेटीला आलं असून, चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

कपिल शर्मा आणि अभिनेत्री इशिता दत्ताने त्यांच्या ट्विटर हँडलवरही हे पोस्टर कव्हर फोटो म्हणून ठेवलं आहे. कपिलच्या आगामी चित्रपटाचं हे पोस्टर पाहता नावाप्रमाणेच त्याला फिरंगी टच पाहायला मिळत आहे. या पोस्टरवर मोठ्या अक्षरांमध्ये फिरंगी असं लिहिलं असून, त्यामध्ये ‘युके’च्या झेंड्याची झलकही पाहायला मिळत आहे. हा कपिलचा दुसरा चित्रपट असून, राजीव ढिंगराने चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

या चित्रपटात कपिलसोबत ईशिता दत्ता आणि मोनिका गिल झळकणार आहेत. इतकंच नाही तर नेहमी विनोदाची फटकेबाजी करणारा कपिल या चित्रपटात एक गाणंही गायला आहे. तेव्हा आता हा फिरंगी प्रेक्षकांची मनं जिंकतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कपिल शर्माचा पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर फारशी जादू करु शकला नव्हता. पण, ‘फिरंगी’कडून फक्त कपिललाच नाही तर प्रेक्षकांनाही बऱ्याच अपेक्षा आहेत.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

कपिल लवकरच लोकप्रिय ‘द कपिल शर्मा शो’ घेऊन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याच्याही चर्चा आहेत. पण अजूनपर्यंत निर्मात्यांनी आणि चॅनलने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

First Published on September 28, 2017 8:34 pm

Web Title: first teaser poster of comedian kapil sharma bollywood movie firangi released
  1. No Comments.