News Flash

रोमान्स आणि ड्रामासाठी हा विकेण्ड ठेवा राखून

आपल्याकडे हल्ली दाक्षिणात्य सिनेमा पाहणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

आपल्याकडे हल्ली दाक्षिणात्य सिनेमा पाहणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेकदा बॉलिवूड सिनेमांना बगल देऊन दाक्षिणात्य सिनेमे पाहिले जातात. याचं ताजं उदाहरण म्हणजे बाहुबली- २ हा सिनेमा. सुट्टींच्या दिवशी अनेक वाहिन्यांवर दाक्षिणात्य सिनेमेच दाखवले जातात. आता सोनी मॅक्सवर नितीन रेड्डी आणि मिश्टी चक्रवर्ती यांचा ‘सबसे बढकर हम ३’ या डब सिनेमासोबत तुमच्या विकेंडची दमदार सुरुवात करण्यास सज्ज आहे.

अपघाताने घडणाऱ्या प्रेमाची कथा सांगणाऱ्या या सिनेमात प्रेम कुठेही होऊ शकते हे दाखवण्यात आलं आहे. ए. करुणाकरण दिग्दर्शित सबसे बढकर हम ३ हा २०१४ मध्ये आलेल्या ‘चिंदना नी कोसम’ या हिट तेलगु सिनेमावरून डब करण्यात आला आहे. ही कथा आहे नितीन (नितीन रेड्डी) या आनंदी तरुणाची. नितीनला कसल्याही महत्त्वाकांक्षा नाहीत. एकदा ट्रेनच्या प्रवासात तो नंदिनीला पाहतो आणि या सहप्रवाशाच्या प्रेमात पडतो. नितीनच्या कुटुंबाला त्याच्या लग्नाची घाई झाली आहे.

मात्र, आपल्यासाठी कोणीतरी आपलं खास माणूस असतं यावर त्याचा विश्वास आहे. तो पुन्हा एकदा नंदिनीला भेटतो आणि या भेटीनंतर तो पूर्णपणे बदलून जातो. त्याच्या मागणीला प्रतिसाद न देणाऱ्या नंदिनीचे मन जिंकून घेण्यासाठी तो प्रयत्न करतो. काही काळाने त्याला कळतं की नंदिनी तिच्या आजोबांसोबत देश सोडून जातेय. यावेळी तो हृदयाची हाक ऐकतो आणि एका महत्त्वाच्या मोहिमेवर जाणाऱ्या नंदिनीच्या मागे बार्सिलोनामध्ये पोहोचतो. आपले नंदिनीवर किती प्रेम आहे, हे तिला सांगण्यासाठी नितीन तिला भेटू शकेल का? नंदिनीचे मतपरिवर्तन होईल का? हे जाणून घेण्यासाठी पाहा सबसे बढकर हम ३ फक्त सोनी मॅक्सवर शुक्रवार १८ मे रोजी रात्री ९ वाजता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2018 8:02 pm

Web Title: first time in hindi television south movie sabse badhkar hum 3 premier
Next Stories
1 मिशन इम्पॉसिबलः फॉलआउटचा ट्रेलर पाहिलात का?
2 शरद पवारांनी आमिर खानला दिला ‘हा’ सल्ला
3 …म्हणून फेसबुकवरही अमिताभ बच्चनच ‘शहेनशहा’
Just Now!
X