News Flash

मराठीत लेखकाला पहिल्यांदाच नफ्यातला दहा टक्के वाटा

हे पाऊल भविष्यात लेखकांच्या करारामधील महत्त्वाचं वळण ठरू शकेल.

हृषिकेश कोळी

‘नटसम्राट’ आणि ‘व्हॉट्स अॅप लग्न’ या यशस्वी सिनेमांची निर्मिती करणारी विश्वास जोशी यांची ‘फिनक्राफ्ट मीडिया अँड एंटरटेनमेंट’ ही निर्मिती संस्था त्यांच्या तिसऱ्या सिनेमाची तयारी करत आहे. ‘घ्ये डबल’ असं या सिनेमाचं नाव असून विल्यम शेक्सपिअरच्या ‘कॉमेडी ऑफ एरर’ या नाटकावर हा सिनेमा आधारित आहे. याचे दिग्दर्शन विश्वास जोशी करत असून पटकथालेखन हृषिकेश कोळीचे आहे. सध्या सिनेमाच्या पटकथेवर काम सुरू असून याचे संवादही हृषिकेशच लिहितोय. शेक्सपिअरवरच्या लिखाणावर होऊ घातलेला मराठीतील हा पहिलाच सिनेमा आणि तोही कॉमेडी.

या सिनेमाचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमासाठी लेखकाला पहिल्यांदाच नफ्यातला दहा टक्के वाटा मिळणार आहे. भविष्यात जर हा चित्रपट मराठी व्यतिरिक्त कुठल्या दुसऱ्या भाषेत तयार झाला तर त्या चित्रपटातच्या नफ्यातला दहा टक्के वाटा हृषिकेशला मिळणार आहे. विश्वास जोशी यांनी निर्माता म्हणून उचललेलं हे पाऊल भविष्यात लेखकांच्या करारामधील महत्त्वाचं वळण ठरू शकेल.

Video : रजनीकांत- नवाजुद्दीन पहिल्यांदाच एकत्र; ‘पेट्टा’चा मोशन पोस्टर प्रदर्शित

व्यावसायिक सिनेमातील कथेची नवी लाट हृषिकेश ‘बॉईज २’, ‘बच्चन’, ‘आश्चर्य-फकीट’, ‘येरे येरे पैसा २’, ‘माझा अगडबम’ अशा सिनेमांतून प्रेक्षकांपर्यंत आणतोय. त्यात या नव्या कराराने वेगळे सकारात्मक वळण आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 2:34 pm

Web Title: first time in marathi movie industry 10 percent of profit to be given to film writer
Next Stories
1 Video : रजनीकांत- नवाजुद्दीन पहिल्यांदाच एकत्र; ‘पेट्टा’चा मोशन पोस्टर प्रदर्शित
2 ‘दुनिया गोल है’! सुबोध भावेच्या हस्ते लहानपणी मिळाला पुरस्कार, आता साकारतेय प्रेयसीची भूमिका
3 #BadhaaiHo : आयुषमान खुरानावर बॉलिवूड कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव, जाणून घ्या नेमकं काय आहे कारण?
Just Now!
X