मोगलीच्या ‘द जंगल बुक’ या लाईव्ह अॅक्शन चित्रपटाचा थ्रीडी टिझर लॉच करण्यात आल्यानंतर दोन दिवसांपूर्वी या चित्रपटाचा संपूर्ण ट्रेलर लॉंच करण्यात आला आहे. ‘द जंगल बुक’ या चित्रपटाच्या टिझरमध्ये संदिग्धता निर्माण करण्यात आली होती परंतु मंगळवारी संपूर्ण ट्रेलर लॉंच केल्यानंतर आता या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.
जंगलातील प्राणी आपल्यासोबत असले की,किती बरं वाटेल ना,मोगलीही अशा हिंस्त्र प्राण्यांसोबत दोस्ती करताना आणि त्यावर आलेले प्रसंग अनुभवताना दिसणार आहे. या चित्रपटात फक्त एकच मानवी पात्र आहे बाकी संपूर्ण प्राणीजीव असल्याने या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता बच्चेकंपनीसह सर्वांना राहणार आहे. ‘द जंगल बुक’ मध्ये भारतीय वंशाचा बालकलाकार नील सेठी या मुलाने मोगलीची भूमिका साकारली आहे. बेन किंग्जले यांनी मोगलीचा जिवलग मित्र ‘बगिरा’ या पात्राला आवाज दिला आहे. ‘बल्लु’ या अस्वलच्या पात्राला सुप्रसिद्ध कॉमे़डियन बिल मरे यांनी आवाज दिला आहे.  इद्रिस अल्बा, स्कारलेट जॉनसन, क्रिस्टोफर वॉकेन यांनी सुद्धा चित्रपटातील पात्रांना आवाज दिले आहेत. डिस्नीचा ‘द जंगल बुक’ पुढीलवर्षी  एप्रिल महिन्यात प्रदर्शित होईल.

Mumbai Police Arrest Accused Pretending to be from Akshay Kumar s Production Company Trying to Cheat
अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा