News Flash

पहाः ‘रज्जो’ चित्रपटाचा ट्रेलर

राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कंगना रणावत ही विश्वास राव दिग्दर्शित 'रज्जो' चित्रपटात दिसणार आहे.

| September 28, 2013 02:34 am

राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कंगना रणावत ही विश्वास राव दिग्दर्शित ‘रज्जो’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिने एका मुजरेवालीची भूमिका केली आहे.
कंगना रणावतची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट मुजरा घराण्यावर आधारित आहे. तसेच, या चित्रपटात महेश मांजरेकरचीही भूमिका असून त्यांनी यात तृतीय पंथीयाची (षंढ) भूमिका साकरली आहे. व्यापक रेड लाइट परिसराचा सेट तयार करण्यासाठी दिग्दर्शकाने अमाप खर्च केला आहे. खुद्द रेड लाइट भागात चित्रिकरण करणे शक्य नसल्याने हा सेट उभारण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ‘रज्जो’ ची निर्मिती फोर पिलर फिल्म्सने केली आहे.
कंगनासोबतच पारस अरोरा, प्रकाश राज, जया प्रदा आणि उपेंद्र लिमये यांच्या भूमिका असलेला ‘रज्जो’ १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मुख्य भाग म्हणजे याच दिवशी संजय लीला भन्साली दिग्दर्शित दीपिका-रणवीरचा रामलीला देखील प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2013 2:34 am

Web Title: first trailer kangana ranaut turns nautch girl for rajjo
Next Stories
1 ‘डेंग्यू’मुळे रणविर सिंग रूग्णालयात
2 अक्षय कुमारचा ‘बिग बॉस’ डॅनी
3 यश चोप्रा एक निर्भिड चित्रपट निर्माते होते! – शाहरूख खान
Just Now!
X