News Flash

या दमदार संवादांमुळे गाजतोय ‘राजी’; गल्ला ६० कोटींवर

आलियाच्या 'राजी' या चित्रपटाची बॉक्स ऑफीसवर घोडदौड सुरूच आहे.

विकी कौशल, आलिया भट्ट

आलिया भट्ट आणि विकी कौशल यांची उल्लेखनीय कामगिरी असलेल्या ‘राजी’ या चित्रपटाची बॉक्स ऑफीसवर घोडदौड सुरूच आहे. चांगल्या कमाईने ओपनिंग करणारा हा या वर्षातला पाचवा चित्रपट ठरला असून प्रदर्शनानंतरच्या नवव्या दिवशी, शनिवारी ‘राजी’नं तब्बल ७.५४ कोटींचा गल्ला जमवला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण ६८.८८ कोटींची कमाई केली आहे.

‘राजी’च्या या यशासाठी उत्तम कथा, कलाकारांचं दमदार अभिनय आणि सर्वोत्तम संवाद या गोष्टी कारणीभूत आहेत. एका महिला गुप्तहेराच्या जीवनावर आधारित या चित्रपटात आलिया आणि विकीनं अप्रतिम अभिनय केला आहे. प्रेक्षक- समीक्षकांकडून दोघांचंही कौतुक होत आहे. ‘ऐ वतन’ सारखं देशभक्तीपर गाणं असो किंवा मग त्यातील दमदार संवाद, प्रेक्षकांना या चित्रपटातील बऱ्याच गोष्टी भावल्या आहेत. सिनेमागृहात प्रेक्षकांची दाद मिळवणारे हे दमदार संवादा कोणते आहेत ते पाहूयात..

१. वो आसमान देख रहे होंगे..और हम उनके पांव तले से जमीन खींच लेंगे

shishir sharma शिशिर शर्मा

२. मै चाहता हूँ.. तुम हिंदुस्तान की आँख और कान बनके रहो

३. एक भूल..एक चूक हुई..तुम्हारी लाश जमीन पे पडी होगी

४. हमारे इतिहास मे ऐसे लोग है, जिन्हे कोई इनाम या मेडल नहीं मिलता. हम उनका नाम तक नहीं जानते है, ना ही उन्हे पहचानते है..सिर्फ वतन के झंडे पर अपनी याद छोड जाते है

५. वतन के आगे कुछ नाही..खुद भी नही

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2018 6:17 pm

Web Title: five best dialogues of raazi and box office collection alia bhatt vicky kaushal
Next Stories
1 Video : २४ वर्षांनंतर ‘लो चली मैं’वर पुन्हा एकदा थिरकल्या रेणुका- माधुरी
2 कर्नाटकच्या राजकीय नाट्यात ‘ति’ला का केलं जातंय सर्वाधिक सर्च?
3 मालवणी बोलीतील पहिला चित्रपट ‘रेडू’
Just Now!
X