News Flash

फेब्रुवारीत रंगणार चित्रपटांचा महोत्सव!

एका पेक्षा एक अशा पाच दर्जेदार चित्रपटांचे एकाचवेळी प्रदर्शन कारण्याचे शिवधनुष्य उचलले आहे.

मराठी चित्रपट नेहमीच एका उंचीवर राहिला असून, आता त्याच्या आर्थिक आकडेवाढीमुळे तो अधिकच दर्जेदार आणि उच्च पातळीवर गेला असल्याचे काही महिन्यांपासून आपणास दिसून येते.

भाषा, संस्कृती, प्रांताच्या सीमा ओलांडून जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीच्या यशस्वी प्रवासातील एक अद्वितीय टप्पा म्हणजे एल. जी प्रोडक्शन्स, सदानंद (पप्पू) लाड व अंकुर चित्र निर्मित चित्रपटांचा महोत्सव. येत्या २६ फेब्रुवारीला आपल्यासाठी एकचं प्रोडक्शन हाऊस, एकाचं वेळी- एक नाही, दोन नाही, तीन नाही तर ‘पाँच का धमाका’ असलेली  ५ चित्रपट, ५ थेटर, ५ शो ऑफर घेऊन येणार आहेत. मराठी चित्रपट नेहमीच एका उंचीवर राहिला असून, आता त्याच्या आर्थिक आकडेवाढीमुळे तो अधिकच दर्जेदार आणि उच्च पातळीवर गेला असल्याचे काही महिन्यांपासून आपणास दिसून येते. आजवर बॉलीवुड अथवा हॉलीवुडमध्ये सुद्धा एकाचं प्रोडक्शन हाऊसने एकाचं वेळी पाच-पाच चित्रपटांचे प्रकाशन करण्याची जोखीम कधीच उचललेली नसताना मराठी चित्रपट सृष्टीत प्रथमच एल. जी प्रोडक्शन्स, सदानंद (पप्पू) लाड व अंकुर चित्र यांनी ‘धुरपी’, ‘सावळ’, ‘कुंभारवाडा डोंगरी’, ‘स्वामी’, ‘एक कटिंग चाय १/२’ यांसारख्या एका पेक्षा एक अशा पाच दर्जेदार चित्रपटांचे एकाचवेळी प्रदर्शन कारण्याचे शिवधनुष्य उचलले आहे.

२६ फेब्रुवारीला मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रांत मोलाचे योगदान असलेले निर्माते सदानंद (पप्पू) लाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रदर्शित होणारे एकाहून एक सरस चित्रपट रसिक प्रेक्षकांची मने जिंकण्यास सज्ज झालेले आहेत. एल. जी प्रोडक्शन्स, सदानंद (पप्पू) लाड व अंकुर चित्र निर्मित, प्राध्यापक देवदत्त हुसळे कथित व शशिकांत तुपे दिग्दर्शित ‘धुरपी’, प्रदीप म्हापसेकर कथित व श्री भगवान दास दिग्दर्शित ‘सावळ’, सदानंद (पप्पू) लाड कथित व सदानंद (पप्पू) लाड आणि शशिकांत तुपे दिग्दर्शित ‘कुंभारवाडा डोंगरी’, सदानंद लाड कथित व अंकुर लाड आणि रमेश सुर्वे दिग्दर्शित ‘स्वामी’ त्याचप्रमाणे जय तारी कथित व दिग्दर्शित ‘एक कटिंग चाय १/२’ यांसारखे वेगवेगळे विषय आणि दर्जेदार कलाकृती, चित्रपट सृष्टीत हाताळल्या जाणाऱ्या या अद्भूत प्रदर्शनाच्या पद्धतीमुळे  एका अनोख्या स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीस उतरणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 10:26 am

Web Title: five marathi movies releasing in february 2017
Next Stories
1 तिसरी गोष्ट: १२ मार्च १९९३ मुंबई बॉम्बस्फोट
2 प्रशांत दामले सांगणार भविष्यवाणी!
3 शशांक केतकरची झालीय गोची!
Just Now!
X