News Flash

Flashback 2018 : सुपरहिट सेलिब्रिटींचे सुपरफ्लॉप चित्रपट !

यंदा बॉक्स ऑफिसवर तिन्ही खानची जादू पूर्णपणे फिकी पडली.

बॉलिवूडमध्ये या वर्षांत अनेक मोठ मोठे चित्रपट आले. यातले काही सुपरहिट ठरले तर काही पडद्यावर चांगलेच आदळले. विशेष म्हणजे यंदाचं वर्ष हे स्मॉल बजेट चित्रपटांचं ठरलं. या वर्षांत ‘स्त्री’, ‘अंधाधून’, ‘बधाई हो’ सारखे कमी पैशांत तयार केलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच चालले, मात्र यंदा बॉक्स ऑफिसवर तिन्ही खानची जादू पूर्णपणे फिकी पडली.
रेस ३
सलमान खानचा ‘रेस ३’ छोट्या पडद्यावर आदळला. चित्रपटाचं कथानक पाहता या चित्रपटाची खिल्ली सोशल मीडियावर उडवली. समीक्षकांकडूनही वाईट प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला मात्र बॉक्स ऑफिसवर २०० कोटींची कमाई करण्यास हा चित्रपट यशस्वी झाला.

नमस्ते इंग्लड
अक्षय, कतरिनाचा ‘नमस्ते लंडन’ चित्रपट चांगला सुपरहिट ठरला. मात्र नमस्ते इंग्लड फ्लॉप झाला. अर्जुन कपूर, परिणिती चोप्राची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटानं पहिल्या आठवड्यात जेमतेम १० कोटींची कमाई केली. विपुल शहा दिग्दर्शित चित्रपटची जादू बॉक्स ऑफिसवर चालली नाही मात्र त्यांनीच दिग्दर्शन केलेला ‘नमस्ते लंडन’ हा २००७ मधला सुपरहिट चित्रपट ठरला होता.

ठग्ज ऑफ हिंदोस्तान
आमिर खान, अमिताभ बच्चन, फातिमा सना शेख, कतरिना कैफ अशी तगडी स्टारकास्ट असताना ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ चांगलाच आदळला. आमिरनं या चित्रपटाच्या अपयशाची जबाबदारी स्विकारली. या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूपच अपेक्षा होत्या मात्र प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे आकर्षित करण्यास हा चित्रपट पूर्णपणे अपयशी ठरला.

झिरो
शाहरुख खान, कतरिना कैफ, अनुष्का शर्मा यांची प्रमुख भूमिका असलेला झिरो गेल्याच आठवड्यात प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटानं प्रेक्षकांची घोर निराशाच केली. वेगळा प्रयोग, कलाकारांची मेहनत या साऱ्या गोष्टी असल्या तरी केवळ भरकटलेल्या कथानकामुळे हा चित्रपट फ्लॉप ठरला.

परी
अनुष्का शर्माची प्रमुख भूमिका असलेला परी हा चित्रपटदेखील प्रेक्षकांना चित्रपटगृहात आकर्षित करण्यास पूर्णपणे अपयशी ठरला. भयपट असलेल्या या चित्रपटात अनुष्कानं वेगळी भूमिका साकारली होती मात्र तिच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर चालली नाही.

फन्ने खान
ऐश्वर्या राय, राजकुमार राव, अनिल कपूर अशी तगडी स्टारकास्ट असताना फन्ने खान हा सुपरफ्लॉप चित्रपट ठरला. अनिल कपूर ऐश्वर्या अशी जोडी बऱ्याच वर्षांनी प्रेक्षकांना पाहायला मिळणार होती, मात्र फन्ने खान अपेक्षाभंग करणारा ठरला.

हेलिकॉप्टर इला
आजच्या पीढीतील आई आणि मुलांचं नातं सांगणार हेलिकॉप्टर इला ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटात बॉलिवूडची एकेकाळची सुपरस्टार अभिनेत्री काजोल प्रमुख भूमिकेत होती. कालोजचा हेलिकॉप्टर जेमतेम ५ कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर आदळला.

बत्ती गुल मिटर चालू
शाहिद कपूर, श्रद्धा कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला बत्ती गुल मिटर चालू हा चित्रपट एका महत्त्वाच्या सामाजिक विषयावर भाष्य करत होता. मात्र या चित्रपटाचं बॉक्स ऑफिसवरचं मीटर पूर्णपणे डाऊन झालं.

लव्हयात्री
सलमानची निर्मिती असलेला लव्हयात्रीतून आयुश शर्मा आणि वरिना हुसेननं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाची गाणी हिट ठरली मात्र चित्रपट छोट्या पडद्यावर पूर्णपणे फ्लॉप ठरला.

मनमर्झिया

अभिषेक बच्चन, तापसी पन्नू, विकी कौशल यांची प्रमुख भूमिका असलेला मनमर्झियाही फ्लॉप ठरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 3:25 pm

Web Title: flashback 2018 movies of this year
Next Stories
1 कॅन्सरग्रस्त मुलांसोबत ऐश्वर्याने साजरा केला ख्रिसमस
2 या खेळावर आधारित ‘सूर सपाटा’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
3 Flashback 2018 : #MeTooच्या वादळात अडकलेले बॉलिवूडचे मोठे सेलिब्रिटी
Just Now!
X