dilip-thakur-loksattaहा क्षण ‘हमाल! दे धमाल’च्या रौप्यमोहत्सवी सोहळ्यातील… पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित हा मनोरंजक चित्रपट ५ ऑगस्ट २०१४ ला २५  वर्षे पूर्ण करून आता या वर्षापासून पुढचा धमाल प्रवास करत आहे. खूप खूप अभिनंदन! या चित्रपटाच्या यशात कथा-कल्पना, लक्ष्मीकांत बेर्डेचा ‘हमाला’पासून सुपर स्टारपदापर्यंतचा प्रवास, त्याला हिकमतीने मोठे करणाऱ्या वर्षा उसगावकरची ग्लॅमरस भूमिका, या दोघाना रवीन्द्र बेर्डे, सुधीर जोशी, निळू फुले इत्यादी अनेक कलाकारांची लाभलेली साथ, अनिल मोहिले यांचे लोकप्रिय संगीत, उत्तम प्रमोशन आणि नेटके प्रदर्शन अशा अनेक गोष्टींची छानच केमेस्ट्री आहे. ‘अरे बजरंगाची कमाल’ हे गोविंदा गीत ‘ढाकूमाकूम ढाकूमाकूम’ असा झक्कास ताल धरायला लावते. एका प्रसंगात लक्ष्याची बहिण तिला लग्नासाठी पाहायला येणाऱ्यांसमोर ‘मळ्याच्या मळ्यामंदी पाटाचे पाणी जाई’ हे जुने गीत गाते, येथे दिग्दर्शक दिसतो असे म्हणायचे.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Mukta Barve and Madhugandha Kulkarni worked together Naach ga ghuma film for the first time after 20 years of frendship
२० वर्षांच्या मैत्रीत मुक्ता बर्वे आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच केलं एकत्र काम; ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे मिळाली संधी
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Narayani Shastri family
पाच बहिणी अन् एक भाऊ, आई महाराष्ट्रीय तर वडील…; प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबाबद्दल दिली माहिती