08 July 2020

News Flash

फ्लॅशबॅक : जुम्मा चुम्मा दे दे …

अमिताभने किमीची छेड काढताना सगळा अभिनय अनुभव पणाला लावला.

dilip thakur‘हम’ला पंचवीस वर्षे होत असताना (प्रदर्शन १ फेब्रुवारी १९९१) ‘जुम्मा जुम्मा दे दे’ची आठवण सहज येणारच …साधारण तीन-चार महिने अगोदर हे गाणे ध्वनिफितीवर उपलब्ध होताच (तेव्हा़चे तेच प्रमुख माध्यम) गाणे बघता बघता लोकप्रिय झाले देखिल. कमालीचा जोश, उत्स्फूर्तपणा, आक्रमकता यांचे मिश्रण असणारे हे गाणे अमिताभने किमी काटकरसोबत कसे सादर केले असेल याबाबतची उत्सुकता त्यात होतीच… तेवढ्यात, ‘थानेदार’चे ‘तम्मा तम्मा लोगो’ देखिल त्याच ‘चालित’ व ‘वेगा’ने आले व या गाण्याचा जन्म नेमका कोठून यावर वाद सुरु झाला. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी गाणे ‘आपलेच’ असा सूर लावला, बप्पी लहरी सांगू लागला, दक्षिण आफ्रिकन संगीताने प्रभावित होऊन आपण तम्मा गायले. ते संजय दत्त – माधुरी दीक्षितवर होते.

सर्वप्रथम ‘हम’ झळकला आणि ‘पडदाभर’ नृत्य-दृश्य सौंदर्याचा धमाका पाहून खरच ‘पैसा वसूल’ अशी प्रतिक्रिया उमटली. अमिताभने किमीची छेड काढताना सगळा अभिनय अनुभव पणाला लावला. किमीकडे अर्थात मोहक सौंदर्याचे शस्त्र होते. ते तिने व्यवस्थित चालवले. तरी दिग्दर्शक मुकूल आनंदचा हा चित्रपट रजनीकांत, गोविंदा, शिल्पा शिरोडकर, दीपा साही, डॅनी डेन्झोपा, अन्नू कपूर, कादर खान अशी कलाकार मंडळी असूनही फारसा रंगला नाही ….

तत्पूर्वी दीड दोन वर्षापूर्वीचा मेहबूब स्टुडिओतील त्याचा मुहूर्त झकास अनुभव ठरला. निर्माता रमेश शर्माने ‘हम’ चा मुहूर्त खणखणीत ठरवण्यासाठी कसलीही कसर शिल्लक ठेवली नव्हती. खर तर , त्या काळात नविन चित्रपटाच्या मुहूर्तना हजर राहण्यातही गंमत होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2016 1:05 am

Web Title: flashback hum movie compeleted 25 years
टॅग Dilip Thakur
Next Stories
1 सनी लिओनी लवकरच दिसणार बॉलीवूडच्या ‘संस्कारी’ बाबूजींसोबत
2 ‘असा नट होणे नाही’; आमीरकडून नाना पाटेकर यांच्या अभिनयाची प्रशंसा !
3 आमच्या नात्याविषयी वायफळ चर्चा करणे थांबवा; अरबाझ खानची संतप्त प्रतिक्रिया
Just Now!
X