dilip thakurएखादा हिंदी चित्रपट दोन-चार वर्षांनी नाव बदलून छोट्या शहरात प्रदर्शित करण्याचा खेळ-मेळ नेहमीचा. अमिताभ-हेमा मालिनीचा प्रमोद चक्रवर्ती दिग्दर्शित ‘नास्तिक’ असाच ‘अर्धम’ नावाने झळकला. मराठीतही असे अधे-मधे होते.

त्यात ‘नशिबवान’ (१९८८) चित्रपटाची कथाच वेगळी. घरातील मोलकरीणचे (उषा नाडकर्णी) सर्वप्रथम क्रमांकाचे विजेते लॉटरीचे तिकिट तिच्या अज्ञानाचा फायदा उठवत कुटुंबप्रमुख (मोहन जोशी) आपलेसे करतो. पण म्हणून काही त्याला सुख लाभत नाही. अशी अतिशय सरळमार्गी सोपी कथा असणारा हा कौटुंबिक सामाजिक चित्रपट दिग्दर्शक एन. एस. वैद्य यानी साकारला. एन. एस. वैद्य संकलनाकडून दिग्दर्शनाकडे वळले आणि ‘लेक चालली सासरला’ पासून त्यानी आपले वैशिष्ट्य जपले. पण अरुण गोडबोले निर्मित ‘नशिबवान’ ला समिक्षकांनी चांगले म्हटले, तरी प्रेक्षकांचा काहीच प्रतिसाद मिळाला नाही. आशा काळे, मोहन जोशी, नितिश भारद्वाज, अलका कुबल (तोपर्यन्त ती आठल्ये झाली नव्हती), उषा नाडकर्णी, चंदू पारखी, राहूल सोलापूरकर, जयराम कुलकर्णी, बेबी ऋतुजा (मोठेपणीची ऋतुजा देशमुख) अशा नामवंत कलाकारांच्या जोडीला विशेष भूमिकेत लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया अरुण… सुधीर मोघेंच्या गीताना आनंद मोडकचे संगीत. संगळे कसे जमून आले तरी प्रेक्षक चित्रपटगृहाकडे येईनात.

actor pratik gandhi talks about experience working with vidya balan
‘चरित्रपटांचं आव्हान अधिक भावतं’
vasai, virar, palghar, lok sabha election 2024, Hitendra Thakur
सर्व पक्षांनी मलाच पाठिंबा द्यावा, हितेंद्र ठाकूर यांची चित्रफित प्रसारित
Gajanan Kirtikar
शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकरांनी सुनावले; म्हणाले, “भाजपाला जनतेचा भक्कम पाठिंबा, ईडीचे प्रयोग थांबवले पाहिजे”
Magnus Carlsen believes R Pragyanand is expected to perform well chess match
प्रज्ञानंदकडून चांगली कामगिरी अपेक्षित – कार्लसन

काही महिन्यानी हाच चित्रपट नावात बदल करून ‘नशिबवान मोलकरीण’ नावाने प्रदर्शित केला. तेव्हा कुठे थोडेसे नशीब उघडले. कथा चांगली असली तरी चित्रपटाची पहिली ओळख त्याचे नाव… ‘नशिबवान’ निर्मात्याना ते पटकन सुचते.
दिलीप ठाकूर