चित्रपट म्हणजे किती प्रकारची वैशिष्ट्ये असाच एक फंडा म्हणजे, चित्रपटातील पाहुणा कलाकाराचा. अनेकदा तरी एखादे गाणे व दोन चार प्रसंगापुरती ही भूमिका असते. त्यासाठी एखादा मोठा स्टार असेल तर चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीसाठी त्याचा बराच उपयोग होतो. पण तो जर ‘सुपर स्टार’ असेल आणि ओळीने त्याचे चित्रपट सुपर हिट होत असतील तर?

रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘अंदाज’ (1९७1) च्या वेळेस अगदी तेच तर झाले. राजेश खन्नाचा असा काही झंझावात होता की मुंबईतील सत्तर टक्के चित्रपटगृहात त्याचेच चित्रपट सुरु होते व दक्षिण मुंबईतील मुख्य चित्रपटगृहात त्याचे ओळीने सतरा चित्रपट रौप्य महोत्सवी आठवड्याचे यश मिळवण्यात यशस्वी ठरले. तर मग मोटारसायकलवरून हेमा मालिनीसोबत ‘अंदाज ‘ मधील ‘जिंदगी एक सफर है सुहाना…’ या आयुष्याचे तत्व हसतखेळत सांगणारे गाणे व त्याचा अपघाती मृत्यू एवढ्याश्या भूमिकेत तोच भाव खाऊन जाणार स्वाभाविक होतेच.

What Bacchu Kadu Said?
अमरावतीतल्या मैदान राड्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला अटक व्हावी म्हणून राणा दाम्पत्याने…”
Pimpri, police died, police hit by vehicle,
पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू
Virat Kohli's video goes viral
IPL 2024: गौतम गंभीरच्या गळाभेटीवर विराटने सोडले मौन; चाहत्यांना म्हणाला, ‘तुमचा मसाला संपला म्हणून तुम्ही…’, पाहा VIDEO
Raj Thackeray and anjali Damania
“ईडीचं चक्र होतं म्हणून…”, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दर्शवल्यानंतर अंजली दमानियांचं मोठं विधान

आता अतिशय बिझी असूनही अथवा त्याच्या डायरीत एकही मोकळी तारीख नसतानाही या गाण्यापुरता वेळ त्याने काढला यात आश्चर्य नकोच. कारण ‘युनायटेड प्रोड्युसर’ने (तेव्हाच्या आघाडीच्या नऊ निर्मात्यांची संस्था) नवीन चेहरे शोधण्याच्या स्पर्धेत जतीन (राजेश खन्नाचे खरे नाव) खन्नाने जिंकताच निर्माते जी. पी. सिप्पीने त्याला ‘राज’ (1९६७) चित्रपटासाठी (दिग्दर्शक भास्कर दवे) करारबद्ध केले. महत्त्वाचे म्हणजे कालांतराने आयफाचा जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना राजेश खन्नाने भावूक होत हे आठवणीने सांगितले.

राजेश खन्ना चलनी नाणे असल्याने पोस्टरवर त्याला मोठीच संधी. खरं तर ‘अंदाज ‘चा नायक शम्मी कपूर होता. पण तोपर्यंत त्याची सद्दी संपली होती. मुंबईतील कृष्णा चित्रपटगृह पाडून त्याजागी उभारलेल्या भव्य ड्रीमलॅन्ड थिएटरचे उदघाटन ‘अंदाज’ने झाले आणि मग चित्रपट रौप्य महोत्सवी आठवड्यापर्यंत यशस्वी ठरला हे सांगायला हवे काय?

काही चित्रपटांची यशाची कुंडली वा पत्रिका कशी असेल हे सांगता येईलच असे नाही . या ‘अंदाज’ चे यश मात्र राजेश खन्नाला दिले गेले. त्याला केवळ गाण्यापुरता पाहण्यासही तात्कालिक चित्रपट रसिकांनी प्रचंड रस घेतला. हीच त्याच्या तेव्हाच्या जबरा क्रेझची पावती होती.
दिलीप ठाकूर