News Flash

फ्लॅशबॅक: मराठी चित्रपटसृष्टीतील ती एकी…

मराठी चित्रपटसृष्टीत बरेच दिवस या पार्टीची चर्चा रंगली.

dilip-thakur-loksattaमराठी चित्रपटसृष्टी म्हणजे कौटुंबिक वातावरण, एकमेकांची ख्याली खुशाली विचारायची, मदतीला धावायचे.. अशा त्या परंपरा, मूल्ये, सभ्यता जपण्याच्या दिवसातील हा क्षण.  ‘पळवापळवी’ या आपल्या आणखी एका रौप्यमहोत्सवी चित्रपटाच्या पार्टीसाठी दादांनी मराठी चित्रपट चित्रपटसृष्टीतील अनेक ‘दादां’ना आमंत्रित केले. नेमका ‘लक्ष्या’ कोल्हापूरात होता. अन्यथा एक अतिशय दुर्मिळ क्षण घडला असता व त्याचे छायाचित्र आठवणीत यायला निमित्त ठरले असते. ‘रामराम गंगाराम’नंतर अशोक सराफ दादांपासून दुरावला, तोही या सोहळ्यास हजर, त्या दिवसांत महेश कोठारे व सचिन पिळगावंकर यांचे चित्रपट एकमेकांशी स्पर्धा करून गर्दी खेचत होते. खरंतर एकाच काळाता दादा, महेश व सचिन असे अभिनेता व दिग्दर्शक आपापले यश भक्कम  करत असताना त्यांच्या ‘एकत्र’ येण्याचा योग दुर्मिळ आणि म्हणूनच महत्त्वाचा. निर्माते विजय कोंडके यांना तेव्हाचे हे महत्त्व पटले असावे. मराठी चित्रपटसृष्टीत बरेच दिवस या पार्टीची चर्चा रंगली. दादांच्या चित्रपटांना रौप्यमहोत्सवी सवय अगदी सोंगाड्या पासूनची आणि या यशचा खणखणीतपणे आनंद सोहळा साजरा करण्याची त्यांची प्रवृत्ती देखील कायम साहिलेली. त्यांचे हे देणेचं त्यांना सतत काही चांगले परतफेड करणारे ठरले असावे. चित्रपट येतात-जातात. त्यातले हे असे मान्यवरांना एकत्र आणणारे क्षण खूप मोलाचे, प्रत्येकाला टॉनिक देणारे आहेत. पण त्यांची एकमेकांपासून ‘पळवापळवी’ करता येणारी नाही…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2015 1:10 am

Web Title: flashback success party of dada kondke
टॅग : Dada Kondke
Next Stories
1 सलमानसोबत काम करण्याची सध्यातरी शक्यता नाही – शाहरुख खान
2 ‘रोबो-२’मध्ये अक्षय कुमार खलनायक!
3 अभिनेते मिलिंद गुणाजी ‘शनी’देवाच्या भूमिकेत!
Just Now!
X