22 September 2020

News Flash

फ्लॅशबॅक : आनंद और आनंद

नवकेतन फिल्मच्या विजय आनंद दिग्दर्शित 'जाना ना दिल से दूर' या चित्रपटाच्या सेटवरचे हे आनंद बंधुंचे छायाचित्र

dilip thakurनवकेतन फिल्मच्या विजय आनंद दिग्दर्शित ‘जाना ना दिल से दूर’ या चित्रपटाच्या सेटवरचे हे आनंद बंधुंचे छायाचित्र आहे असे म्हणताच अनेकांच्या भुवया उंचावतील आणि त्याना प्रश्न पडेल, या आनंद बंधुंचा हा चित्रपट कोणता? कधी बरे प्रदर्शित झाला? वगैरे वगैरे. विशेषत: विजय आनंदच्या अर्थात गोल्डीच्या दिग्दर्शनाचे निस्सीम चाहते तर या चित्रपटाबाबत कमालीचे संभ्रमात पडले असतील. पण जवळपास सर्वच भाषांतील चित्रपटसृष्टीत असे पूर्ण होऊन तर झालेच पण सेन्सॉर संमतही झालेले किती तरी चित्रपट काहीना काही कारणास्तव प्रदर्शित होत नाहीत हे एकदा का मान्य केलेत की या चित्रपटाचेही थिएटरमधे न येणे तुम्ही मान्य कराल. या चित्रपटात कामिनी कौशल, इंद्राणी बॅनर्जी इत्यादी कलाकार तर होतेच पण खुद्द देव आनंदनेही आम्हा काही निवडक समीक्षकांसाठी नवकेतन डबिंग थिएटरमधे याच्या खास खेळाचे आयोजनही केले. पण चित्रपटात या आनंद बंधुंची ती खासियत वा चमक दिसली नाही…. हा चित्रपट खूप नंतरच्या काळातील म्हणजे विजय आनंदच्या दिग्दर्शनातील शेवटचा होता त्यामुळेही तसे झाले असेल. पण विजय आनंदच्या दिग्दर्शनातील देव आनंदने रसिकांच्या किमान दोन पिढ्यांचे अक्षरश: वेड होते. ‘नौ दो ग्यारह’, ‘काला बाजार’, ‘तेरे घर के सामने’, ‘गाईड’, ‘ज्वेल थीफ’, ‘जॉनी मेरा नाम’, ‘तेरे मेरे सपने’, ‘छुपा रुस्तम’… देव आनंदच्या व्यक्तिमत्वातील खूप चांगल्या गोष्टी म्हणजे विशिष्ट शैलीत चालणे, पाहणे, ऐकणे, बोलणे हे गोल्डीच्या दिग्दर्शनात विशेष खुलले. तिच देव आनंदची ओळख, प्रतिमा, लोकप्रियता आहे. देवला गंभीर अभिनय येतो व त्याचे चाहते त्याचा अभिनय गंभीरतापूर्वक पाहतात आणि कौतुक करतात हे गोल्डीच्या दिग्दर्शनातील ‘गाईड’ने सिध्द केले. हे अप्रतिम संगीतमय असे प्रचंड लोकप्रिय चित्रपट आहेत.
‘प्रेम पुजारी’पासून खुद्द देवच दिग्दर्शनात उतरला आणि ही जोडी फुटली. अधेमधे ते ‘छुपा रुस्तम’साठी एकत्र येणे, देवपुत्र सुनीलच्या ‘मै तेरे लिए’चे गोल्डीने दिग्दर्शन करणे या गोष्टींवर त्यांचे चाहते हमखास जुने दिवस आठवत. ‘गाईड’ पन्नास वर्षांनंतरही तेवढाच प्रभावी वाटतोय. पण ‘जाना ना दिल से दूर’?
कधी कधी वाटते असे काही खूपच रखडून पूर्ण झालेले काही चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत हे बरेच झाले. अन्यथा ते पाहून म्हणावेसे वाटेल ‘जाना ना दिल से दूर’…
दिलीप ठाकूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 1:05 am

Web Title: flashback vijay anand and dev anand
Next Stories
1 रामूसाठी अमिताभ बच्चन खोटारडा माणूस, रामूच्या प्रश्नांनी ‘बिग बी’ हैराण
2 महापालिकेचा सलमानला दणका, घराजवळच बांधणार ‘टॉयलेट’ 
3 Tubelight Teaser: सलमानच्या ‘ट्युबलाइट’चा टीझर आला रे…
Just Now!
X