News Flash

सुशांतच्या आत्महत्येनंतर गायिकेने घेतला मोठा निर्णय

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची घटना प्रत्येकाच्याच मनाला चटका लावून गेली.

सुशांत सिंह राजपूत

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची घटना प्रत्येकाच्याच मनाला चटका लावून गेली. सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाही, गटबाजीचा वाद सुरू झाला. नेटकऱ्यांनी काही कलाकारांवर बंदी आणण्याची मोहीमच सुरू केली. यानंतर आता गायिका मैथिली ठाकूर हिने मोठा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर स्टार असलेल्या मैथिलीने यापुढे बॉलिवूड गाणी गाणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर दु:खी झालेल्या मैथिलीने बॉलिवूडच्या गाण्यांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे ती बॉलिवूड चित्रपटांची गाणी गाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. सुशांतच्या आत्महत्येची घटना अस्वस्थ करणारी असल्याची भावना तिने व्यक्त केली.

“सुशांतच्या आत्महत्येच्या घटनेने फार विचार करायला भाग पाडलं आहे. मी माझ्या वडिलांशी याबाबत बोलले. बॉलिवूडबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळत आहेत. पण अशा कोणत्याच गोष्टींना आम्ही थारा देणार नाही. म्हणूनच यापुढे बॉलिवूड गाणी गाणार नसल्याचा निर्णय घेतला आहे”, असं तिने सांगितलं.

अयाची आणि ऋषभ या दोन भावंडांसोबत मिळून मैथिली तिच्या गायनाचे व्हिडीओ फेसबुक आणि युट्यूबवर पोस्ट करत असते. रिअॅलिटी शोमधून पुढे आलेल्या मैथिलीचे देशभरात तिचे लाखो चाहते आहेत. अनेकदा तिने परदेशात जाऊनही गायनाचे कार्यक्रम केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 5:45 pm

Web Title: folk singer maithili thakur decided to not sing any bollywood cover song after sushant singh rajput suicide ssv 92
Next Stories
1 भट्ट कुटुंबीयांनी कंगनाला लाँच केले, घराणेशाही वादावर पूजा भट्टने सोडले मौन
2 केवळ ३३ टक्के युनिटच्या उपस्थितीत मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात- आदिनाथ कोठारे
3 टॉम क्रुज देणार निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना टक्कर?; व्हायरल व्हिडीओमागील सत्य काय?
Just Now!
X