29 October 2020

News Flash

गरजूंच्या मदतीसाठी भाईजान तत्पर; बैलगाडी झाल्यानंतर ‘बिइंग हंगरी’चा ट्रक रवाना

हा ट्रक सलमानच्या आगामी 'राधे' चित्रपटासाठी डिझाइन करण्यात आला होता

बॉलिवूड अभिनेता सलमान खान गेल्या कित्येक दिवसापासून गरजू नागरिकांना मदत करत आहे. आतापर्यंत त्याने विविध मार्गांच्या माध्यमातून गरजूंना अन्नपुरवठा करून त्यांचं पोट भरण्याचा प्रयत्न केला आहे. अलिकडेच त्याने बैलगाडी, ट्रॅक्टरच्या सहाय्याने गावातील लोकांना किराणा सामना पाठविलं होतं. त्यानंतर आता त्याने बिइंग हंगरी या नावाने फूड ट्रक सुरु केला आहे.

‘इंडिया टुडेनुसार, लॉकडाउनमुळे सलमान त्याच्या फार्महाऊसमध्ये अडकला आहे. मात्र त्याच्या मदतीच्या ओघामध्ये कुठेही खंड पडलेला नाहीत. सलमान सतत गरजूंपर्यंत पोहचण्यासाठी, त्यांची मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामध्येच त्याने आता बिइंग हंगरी हा फूड ट्रक सुरु केला आहे. या फूड ट्रकच्या मदतीने तो गरजूंमध्ये जेवण पूरवणार आहे.

‘बिइंग हंगरी’साठी वापरण्यात येणारा ट्रक खरंतर सलमानच्या आगामी ‘राधे’ चित्रपटासाठी डिझाइन करण्यात आला होता. मात्र देशावर ओढावलेल्या संकटात गरजूंचे होणारे हाल पाहून त्याने हा ट्रक ‘बिइंग हंगरी’साठी वापरण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, वांद्र्यामध्ये सलमानच्या एका रेस्टॉरंटमध्ये जवळपास १ हजार जेवणाची पाकिटं तयार केली जातात. ५०० सकाळच्या वेळात आणि ५०० संध्याकाळी. ही पाकिटं सकाळ-संध्याकाळ अशा दोन वेळांमध्ये मुंबईतील ठिकठिकाणच्या झोपडपट्टी, स्टेशन परिसर, मंदिर आणि मस्जीद या ठिकाणी असलेल्या गरीबांमध्ये वाटली जातात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2020 8:45 am

Web Title: food truck designed for salman khan film radhey delivering food to the needy people ssj 93
टॅग Coronavirus
Next Stories
1 “त्या गोष्टीचे दु:ख कायम मनात राहील”; जीमी शेरगील इरफानच्या आठवणींने झाला भावूक
2 तारांगण घरात : नव्या माध्यमांसह कामाला सुरुवात
3 ‘मराठी तरुणांना हिच संधी आहे.. ‘ केदार शिंदेची फेसबुक पोस्ट व्हायरल
Just Now!
X