दोन महिन्यांच्या लॉकडाउननंतर आता संपूर्ण देश टप्याटप्यामध्ये अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीत देखील हळूहळू चित्रीकरण करण्यास सुरुवात होणार आहे. राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार मुंबईमध्ये या महिन्यात चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. पण यामध्ये वयाने १० वर्षांपेक्षा लहान मुले आणि ६५ वर्षांच्या पुढील व्यक्तींना चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. हा नियम करोना व्हायरसमुळे उद्भवलेली परिस्थिती सामान्य होईपर्यंत लागू असणार आहे. त्यामुळे आता निर्मात्यांसमोर मोठे आव्हान आहे.

मुंबईमध्ये करोनाचा संसर्ग झालेले अनेक रुग्ण सापडले असल्यामुळे चित्रीकरणासाठी सरकारने सावधानगी बाळगण्यास सांगितले आहे. सोशल डिस्टंसिंग आणि सॅनेटायझेशन व्यतिरिक्त आणखी काही नियम आखले आहेत. यातील एक म्हणजे वयाने १० वर्षांपेक्षा लहान मुले आणि ६५ वर्षांच्या पुढील व्यक्तींना चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता ज्या मालिकांमध्ये लहान मुले मुख्य भूमिकेत आहेत अशा मालिकांच्या निर्मात्यांसमोर मोठे आव्हान आहे.

 

View this post on Instagram

 

#offscreenmasti #barristerbabu @aurrabhatnagarbadoni

A post shared by barristerbabu (@barristerbabu_official) on

कलर्स वाहिनीवरील ‘बॅरिस्टर बाबू’ आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकांमध्ये बालकलाकार मुख्य भूमिकेत आहेत. त्यामुळे काही निर्मात्यांनी मालिकांच्या प्लॉटमध्ये बदल करण्याचा विचार केला आहे. बॅरिस्टर बाबू मालिकेतील बोंदिता ही ९ वर्षांची मुलगी आता मोठी झाल्याचे दाखवण्यात येणार असल्याचे म्हटले जाते. तिच्या भूमिकेसाठी सध्या निर्माते नव्या कलाकाराच्या शोधात आहेत. अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीची हा भूमिकेसाठी निवड करण्यात येणार असल्याचे म्हटले जाते.

तसेच अनेक मालिका, चित्रपटांमध्ये ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे अनेक कलाकार काम करतात. त्यामुळे अशोक पंडित यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी, ‘आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती आणि अनुपम खेर यांच्यासोबतच अनेक सीनियर टेक्नीशियन्स देखील काम करतात. त्यामुळे या नियमांवर पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. आम्ही याबाबत सरकारला विनंती करतो’ असे त्यांनी म्हटले आहे.