भाषेची बंधने तोडून आतरराष्ट्रीय पातळीवरही ‘सैराट’ या चित्रपटाने स्वत:ला सिद्ध केले आहे. वेगवेगळ्या जागतिक चित्रपट महोत्सवात मोहोर उमटवल्यानंतर आता जगप्रसिद्ध ‘फोर्ब्स मासिक’नेही ‘सैराट’ची दखल घेतल्यामुळे ‘सैराट’च्या यशात आता जागतिक पातळीवरही मानाचा तुरा खोवल्याचे बोलले जात आहे.
‘सैराट’ने सर्वाधिक कमाई करत मराठी चित्रपटसृष्टीत नवा विक्रम केला आहे. तसेच, मराठीत यापूर्वी सर्वाधिक गाजलेल्या नटसम्राट, कट्यार काळजात घुसली, लय भारी, टाईमपास, टाईमपास-२, तसेच, बालक-पालक या सर्व चित्रपटांना मागे टाकले आहे. उभरत्या तारूण्यात पदार्पण केलेल्या आणि विरूद्ध जातीमधील असलेल्या या तरूण-तरूणीची प्रेमकथा प्रेक्षकांना भावल्याचे ‘फोर्ब्स’ने म्हटले आहे.
दरम्यान, सैराटची घोडदौड पाहता ‘सैराट’ आता शंभर कोटींची भरारी घेणार का याचीच आता सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.