13 December 2017

News Flash

श्रद्धाची जागा घेण्यास रणवीर उत्सुक!

अर्जुन, श्रद्धाच्या प्रेमासाठी विनवणी करताना आणि रडताना दिसतो

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: April 11, 2017 4:34 PM

रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर

रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर यांची मैत्री किती पक्की आहे हे काही वेगळं सांगायला नको. हे दोन ‘गुंडे’ कुठेही भेटले तरी त्यांची मस्ती कॅमेऱ्यात कैद झाल्याशिवाय राहत नाही. हे दोघंही एकमेकांचे सिनेमे सोशल मीडियावर सातत्याने प्रमोट करत असतात. अर्जुनने रणवीरच्या ‘बेफिक्रे’चं प्रमोशन केलं होतं. तर आता रणवीरही अर्जुनचा ‘हाफ गर्लफ्रेंड’ प्रमोट करताना दिसतो आहे.

नुकतेच रणवीरने अर्जुनच्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ सिनेमाशीसंबंधित एक ट्विट केलं. अर्जुन या सिनेमात माधव झा या बिहारी मुलाची व्यक्तिरेखा साकारत आहे. त्याला रिया सोमानी (श्रद्धा कपूर) ही त्याची आयुष्यभराची जोडीदार म्हणून हवी असते. पण ती मात्र त्याची हाफ गर्लफ्रेंड म्हणूनच राहते. नुकताच ‘हाफ गर्लफ्रेंड’चा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये अर्जुन, श्रद्धाच्या प्रेमासाठी विनवणी करताना आणि रडताना दिसतो. त्याच्या याच वागण्यावर रणवीरने ट्विट करत म्हटले की, ‘तुला रडताना बघून मला पण रडू येतं बाबा.. तिला फक्त तुझा हाफ हिस्सा व्हायचा आहे. मी तुझा उरलेला हाफ होईन बेटर हाफ. तू फक्त रडू नकोस.’

त्याच्या या ट्विटला अर्जुनने दिलेले उत्तर तुम्हाला नक्कीच हसायला भाग पाडेल. अर्जुनने लिहिले की, ‘तू माझा भाऊ आहेस आणि ती माझा प्राण, मी माझ्या भावासाठी माझे प्राणही देऊ शकतो. तू माझाच आहेस आणि कायम माझाच राहशील.’ त्यांच्या या ब्रोमान्समध्ये परिणीतीनेही आपले प्रेम व्यक्त केले. परिणीतीनेही सांगितले की ती अर्जुनची उरलेली ‘हाफ गर्लफ्रेंड’ बनायला तयार आहे. पण अर्जुनला मात्र रणवीर किंवा तिच्यात कोणाला एकालाच निवडावं लागेल. आता अर्जुन कोणाला निवडणार हे मात्र अजून कळलेलं नाही.