News Flash

“माझ्यावर झालेल्या बलात्काराची कथा अभिनेत्रीने स्वत:च्या नावाने खपवली”

अभिनेत्रीवर मैत्रीणीने केला गंभीर आरोप

अ‍ॅम्बर हर्ड (Amber Heard) फोटो सौजन्य इन्स्टाग्राम

हॉलीवूड सुपरस्टार जॉनी डेप (Johnny Depp) व अ‍ॅक्वामॅन फेम अ‍ॅम्बर हर्ड (Amber Heard) या दोघांमधील वाद आता शिगेला पोहोचला आहे. अ‍ॅम्बर हर्ड ही जॉनी डेपची घटस्फोटित पत्नी आहे. तिने जॉनीवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले आहेत. सध्या हे प्रकरण कोर्टात सुरु आहे. मात्र या प्रकरणात आता आणखी एक नवा ट्विस्ट आला आहे. अ‍ॅम्बरची माजी स्वीय सहाय्यक (former personal assistant) केट जेम्स हिने काही धक्कादायक आरोप केले आहेत. जॉनीवर आरोप करण्यासाठी अ‍ॅम्बरने माझ्या बलात्काराची स्टोरी ट्विस्ट करुन सांगितली असं ती म्हणाली आहे.

अवश्य पाहा – “पत्नीचा मार खाऊन ४८ कोटी रुपये गमावल्यासारखं वाटलं”; अभिनेत्याचा कोर्टात अजब दावा

केट २०१७ पर्यंत अ‍ॅम्बरसोबत काम करत होती. दोघांमध्ये खूप चांगली मैत्री होती. परंतु तिच्यासोबत झालेल्या काही अंतर्गत मतभेदांमुळे तिने काम सोडून दिले. सध्या डेली मेलला दिलेल्या मुलाखतीमुळे केट चर्चेत आहे. या मुलाखतीत तिने अ‍ॅम्बरवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ती म्हणाली, “अ‍ॅम्बर हर्ड एक विक्षिप्त स्त्री आहे. ती लहानसहान मतभेद देखील स्वत:च्या प्रतिष्ठेशी जोडते. त्यामुळेच जॉनीसोबत तिचे अनेकदा भांडण व्हायचे. जॉनी थंड प्रवृत्तीचा व्यक्ती असल्यामुळे तिची गैरवर्तणूक तो सहन करायचा. तिने जॉनीवर खोटे आरोप केले आहेत. तिने माध्यमांना सांगितलेली स्टोरी तिची नसून माझी आहे. माझ्या घटस्फोटित पतीने माझ्यावर लैंगिक अत्याचार केले होते. हा अनुभव मी अ‍ॅम्बरसोबत शेअर केला होता. तोच घटनाक्रम थोडेफार बदल करुन अ‍ॅम्बर सांगत आहे. याबाबत मी पुरावे देखील सादर करु शकते.” केट जेम्सच्या या आरोपांमुळे हॉलिवूड सिनेसृष्टीत खळबळ माजली आहे.

अवश्य पाहा – खरा सुपरहिरो! ‘या’ सहा वर्षांच्या मुलाला मार्व्हलने दिली ‘कॅप्टन अमेरिका’ची शिल्ड

नेमकं प्रकरण काय आहे?

२०१६ साली अ‍ॅम्बर हर्ड व जॉनी डेप विवाहबद्ध झाले होते. अ‍ॅम्बर हर्ड ही जॉनीची तीसरी पत्नी होती. परंतु पुढे अंतर्गत मतभेदांमुळे वर्षभरातच त्यांचा संसार मोडीस निघाला. गेली चार वर्ष दोघे एकमेकांविरोधात आरोप करत आहेत. सर्वप्रथम अ‍ॅम्बरने जॉनीवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप करत ५० लाख अमेरिकी डॉलरचा दावा ठोकला होता. परंतु पुराव्यांअभावी तिचे दावे खोटे ठरले. त्यानंतर जॉनीने तिच्या मानहानिचा दावा ठोकला. हे प्रकरण गेली चार वर्ष कोर्टात सुरु आहे. दरम्यान केट जेम्सच्या आरोपांमुळे या वादाला आता आणखी एक नवे वळण मिळाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 1:15 pm

Web Title: former personal assistant accuses amber heard stole my sexual assault story mppg 94
Next Stories
1 Video : ऋता दुर्गुळेच्या हातावरील टॅट्यू आणि त्या खास व्यक्ती
2 माझ्या नावाच्या फेक अकाऊंटवरुन यूट्यूबवर पॉर्न व्हिडीओ अपलोड होतायेत- कोयना मित्रा
3 Raat Akeli Hai Trailer: नवाजुद्दीन सिद्दिकी उलगडणार मर्डर मिस्ट्री
Just Now!
X