25 February 2021

News Flash

सुदैवानं माझं नाव #MeToo मध्ये आलं नाही- शत्रूघ्न सिन्हा

'या मोहिमेअंतर्गत अनेक प्रसिद्ध माणसांना महिलांनी उद्ध्वस्त केलंय हे मला जाणवलं.'

एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शत्रुघ्न सिन्हा यांनी बॉलिवूडमधल्या #MeToo मोहीमेबद्दल भाष्य केलं.

‘सुदैवानं माझं नाव #MeToo मोहिमेत गोवलं नाही, मी अनेक गोष्टी केल्यात पण आतापर्यंत माझ्यावर कोणत्याही प्रकारचे आरोप झालेले नाहीत’, असं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते आणि राजकीय नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केलं आहे.

एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शत्रुघ्न सिन्हा यांनी बॉलिवूडमधल्या #MeToo मोहिमेबद्दल भाष्य केलं. ‘हा मीटुचा जमाना आहे आणि आजच्या काळात यशस्वी माणसाला उद्ध्वस्त करण्यामागे एक स्त्री आहे हे सांगण्यास मला अजिबात संकोचलेपणा वाटणार नाही. या मोहिमेअंतर्गत अनेक प्रसिद्ध माणसांना महिलांनी उद्ध्वस्त केलंय हे मला जाणवलं.’ असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हाशा पिकला. मी या मोहिमेची खिल्ली उडवत नाही त्यामुळे माझ्या वक्तव्याचा विपर्यास करु नये असंही शस्त्रूघ्न सिन्हा यांनी स्पष्ट केलं.

‘मी अनेक गोष्टी केल्यात पण सुदैवानं मी मीटुच्या तडाख्यातून वाचलो. माझं नाव या मोहिमेतून बाहेर आलं नाही हिच माझ्यासाठी सुदैवाची बाब आहे. मी माझ्या पत्नीचं नेहमीचं ऐकतो ती माझी सुरक्षाकवच आहे. ‘,असंही ते म्हणाले.

‘महिलांप्रती मला आदर आहे. मीटु मोहिमेमुळे उशीरा का होईना महिला समोर आल्यात आपल्यावर झालेल्या अत्याचारांना वाचा फोडण्याचं धाडस त्यांनी दाखवलं या धाडसाचं मला कौतुक वाटतं. मी जे वक्तव्य केलं ते मस्करीत केलंय त्यामुळे त्याचा विपर्यास होणार नाही एवढीच काळजी घ्यावी’ असंही शत्रूघ्न सिन्हा यांनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2019 10:36 am

Web Title: fortunate that my name hasnt come out in metoo shatrughan sinha
Next Stories
1 जॉनच्या ‘पागलपंती’मध्ये झळकणार तगडी स्टारकास्ट
2 देव आनंद यांच्या नातवाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण
3 हुबेहूब दिसणाऱ्या तिला पाहून अनुष्का म्हणते..
Just Now!
X