24 October 2020

News Flash

FIFA World Cup 2018 FINAL : बॉलिवूड म्हणतंय, ‘फ्रान्सने वर्ल्डकप जिंकला तर क्रोएशियाने मनं’

फ्रान्सला शुभेच्छा देत असतानाच बॉलिवूड सेलिब्रिटींनी क्रोएशियाच्या प्रयत्नांचीही दाद दिली.

अभिषेक बच्चन, रणवीर सिंग

फ्रान्सने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. अंतिम फेरीत फ्रान्सने क्रोएशियावर ४-२ असा विजय मिळवून २० वर्षानंतर जगज्जेतेपदाचा बहुमान पटकावला. या विजयानंतर सर्वच क्षेत्रांतून फ्रान्सवर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. यामध्ये बॉलिवूड कलाकारदेखील मागे राहिले नाहीत. फ्रान्सला शुभेच्छा देत असतानाच बॉलिवूड सेलिब्रिटींनी क्रोएशियाच्या प्रयत्नांचीही दाद दिली.

सोशल मीडियावर अनेकांनी आपलं फुटबॉल प्रेम व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. ऐश्वर्या राय बच्चन सध्या मुलगी आराध्यासोबत पॅरिसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. फ्रान्सच्या विजयानंतर तिथल्या रस्त्यांवर कशाप्रकारे जल्लोष साजरा केला जात होता, हे तिनं इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत दाखवलं.

अभिषेक बच्चननेही ट्विटरच्या माध्यमातून फ्रान्सला शुभेच्छा दिल्या.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही आपल्या अंदाजात शुभेच्छा दिल्या. ‘वर्ल्ड कप जिंकल्याने फ्रान्सला शुभेच्छा आणि आमची मनं जिंकल्याने क्रोएशियालाही शुभेच्छा,’ असं ट्विट त्यांनी केलं.

अर्जुन कपूरनेही फ्रान्सच्या दमदार खेळीची स्तुती केली. त्यासोबतच क्रोएशियाच्या प्रयत्नांचीही दाद दिली.

रणवीर सिंगनेही सामनादरम्यान फ्रान्ससाठी चीअर करत असतानाचा जुना फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2018 10:08 am

Web Title: france beat croatia 4 2 to win fifa world cup 2018 celebrity reactions congratulate france
Next Stories
1 #HappyBirthdayKatrinaKaif : कतरिनाबद्दल तुम्हाला या गोष्टी माहित आहेत का?
2 ही ‘बिग बॉस’ स्पर्धक लवकरच अडकणार लग्नबंधनात
3 ‘तो मला वारंवार अंगप्रदर्शन करण्यास सांगायचा’
Just Now!
X