फ्रेंच ऑस्कर सोहळ्यामध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. या सोहळ्यामध्ये एका अभिनेत्रीने चक्क स्टेजवर सर्वांसमोर कपडे उतरवले. या अभिनेत्रीचे नाव कोरिन मासेरियो असे असून ती ५७ वर्षांची आहे. कोरिन जेव्हा स्टेजवर गेली तेव्हा तिने गाढवासारखा पोषाख परिधान केला होता. या अगळ्यावेगळ्या ड्रेसवर रक्ताचे डाग असल्याचे पाहायला मिळते. कोरिनच्या या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. दरम्यान तिने असे काही केले की तेथे उपस्थित असलेले सर्वजण थक्क झाले.

(Source : AP)

कोरिनला स्टेजवर पुरस्कार देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. ती स्टेजवर येताच तिच्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र स्टेजवर पोहोचताच तिने सर्वांसमोर ड्रेस उतरवला आणि नग्नावस्थेत तेथे उभी राहिली. कोरिनने तिच्या पाठिवर फ्रांसच्या पंतप्रधानांसाठी एक संदेश लिहिला होता. त्यामध्ये ‘नो कल्चर, नो फ्यूचर’ म्हणजेच संस्कृती नाही तर भविष्य नाही असे म्हटले आहे.

(Source : AP and Reuters)

गेल्या तीन महिन्यापासून करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे फ्रान्समधील चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे कलाकारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या सर्वाला विरोध दर्शवण्यासाठी कोरिनने वापरलेली अनोखी पद्धत सध्या चर्चेत आहे. कोरिनने तिच्या पाठिवर ‘नो कल्चर, नो फ्यूचर’ असे फ्रेंचमध्ये म्हटले आहे. तिने हा संदेश लिहित चित्रपटगृहे पुन्हा सुरु करण्याची मागणी केली असल्याचे म्हटले जाते.