News Flash

Friendship day 2018 : जुई, गौरीने उलगडलं ‘बीएफएफ’ आणि त्यांच्यासोबतचं नातं

Friendship day 2018. प्रत्येकाच्याच आयुष्यात खास स्थान असणाऱ्या मित्रमंडळींच्या या गराड्यात काहीजण फारच महत्त्वाचे असतात. आपल्या लाडक्या कलाकार मंडळींच्या आयुष्यातही त्यांचे असे हक्काचे बीएफएफ आहेत.

jui
जुई गडकरी आणि तिचे खास मित्रमैत्रीण

Friendship day 2018. प्रत्येकाच्याच आयुष्यात खास स्थान असणाऱ्या मित्रमंडळींच्या या गराड्यात काहीजण फारच महत्त्वाचे असतात. आपल्या लाडक्या कलाकार मंडळींच्या आयुष्यातही त्यांचे असे हक्काचे बीएफएफ आहेत. ज्यांच्यावाचून या कलाकारांना राहवत नाही. विविध मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री जुई गडकरी आणि गौरी नलावडे हिने तिच्या या बीएफएफसोबतच्या नात्याचा उलगडा केला आहे.

‘माझ्यासाठी मैत्री म्हणजे स्वत:चं अस्तित्व टिकवून स्वत:च्या भावना व्यक्त करता येणं, ज्यामध्ये खोटेपणा आणि शंकेला जागा नसेल. आणि एकमेकांच्या विचारात स्पष्टता असणे, कोणत्याही परिस्थितीत एकमेकांच्या सोबतीला कायम आधार म्हणून उभे राहणे हे देखील मैत्रीचं एक कर्तव्य असतं’, असं म्हणत जुईने तिचे विचार मांडले. ‘माझे बरेच मित्र-मैत्रिणी आहेत पण मी सगळ्यांकडेच मी व्यक्त नाही होत किंवा मी सगळंच सगळ्यांशी शेअर करते असं नाही आणि इंडस्ट्रीमध्ये कोणा एका व्यक्तीवर विश्वास ठेवणं फार कठीण. माझ्या आयुष्यात मी कमावलेला माझा खरा मित्र म्हणजे प्रसाद लिमये. गेल्या ८ वर्षांपासून आमची खास मैत्री आहे आणि माझा प्रत्येक वर्षीचा फ्रेंडशिप डे’ हा माझा जिवलग मित्र प्रसाद याच्यासाठी असतो’, असंही ती म्हणाली.

Friendship day 2018 : प्रवासाने शिकवलेली मैत्री… माणसांशी आणि निसर्गाशी

वाचा : Friendship day 2018: तुटलेली पण तरीही मनात रुतलेली मैत्री…

तर, मित्र या शब्दाचा वेगळा अर्थ समजवत तिने याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन मांडला. ‘माझ्या मते मैत्रीचे दोन अर्थ म्हणजे जिथे मित्र आहेत तिथे कुटुंब आहे आणि दुसरे म्हणजे असेही काही मित्र आहेत जे हक्काच्या घराचा, कुटुंबाचा एक भाग झाले आहेत. अशीच आपल्या इंडस्ट्रीमधील माझी हक्काची आणि लाडाची मैत्रिण म्हणजे खुशबू तावडे. खरं तर आम्ही एकमेकींचे निमो आहोत, आम्ही दोघी खोल समुद्रात कधीही हरवलो तरी आम्ही एकमेकांना नक्की शोधून काढू याची आम्हांला खात्री आहे. अशी आमची ही मैत्री. माझ्या निमोवर उर्फ खुशबूवर माझे जिवापाड प्रेम आहे आणि अर्थात तिचं पण माझ्यावर’, असं म्हणत गौरीनेही या खास दिवशी खास नात्याचा उलगडा गेला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2018 3:51 pm

Web Title: friendship day 2018 marathi serial actress jui gadkari shares her friendship bond with her co stares
Next Stories
1 तू तिथे मी! निकसोबत प्रियांका पोहोचली सिंगापूरमध्ये
2 ओबामा दाम्पत्याने ‘या’ भारतीय फिल्ममेकरला दिली पसंती
3 Mission Impossible Fallout : टॉम क्रूझचा चित्रपट पाहण्यासाठी २ हजार फूट उंच कडा सर करून पोहोचले चाहते
Just Now!
X