05 March 2021

News Flash

क्रिकेटपासून दुरावलेला हरभजन सिंह नव्या भूमिकेत, तामिळ सिनेमात करणार अभिनय

हरभजनने शेअर केलं सिनेमाचं पोस्टर

भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंह, आपल्या नव्या भूमिकेसाठी सज्ज झाला आहे. गेली अनेक वर्ष हरभजनला भारतीय संघात स्थान मिळालेलं नाही, मात्र आयपीएलमध्ये तो चेन्नईकडून खेळतो आहे. अशातच हरभजन सिंहने चित्रपटसृष्टीत आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला आहे. हरभजन ‘फ्रेंडशिप’ या तामिळ सिनेमात प्रमुख अभिनेत्याच्या भूमिकेत असणार आहे. खुद्द हरभजनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे.

जॉन पॉल राज आणि शाम सूर्या यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. पोस्टर पाहिल्यानंतर, चित्रपटाची कथा ही दंगलीच्या पार्श्वभूमीवर असल्याचं दिसून येतं. तामिळ सोबत आणखी ४ भाषांमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी हरभजन सिंहने टिव्हीवर अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये आपली हजेरी लावली आहे. त्यामुळे हरभजनचे चाहते त्याला या नवीन भूमिकेत स्विकारतात का हे पहावं लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2020 10:34 am

Web Title: friendship poster harbhajan singh to play male lead in tamil film psd 91
टॅग : Harbhajan Singh
Next Stories
1 ‘T-20 मधील सर्वात महागडे षटक कोणते?’; ICC च्या प्रश्नावर स्टुअर्ट ब्रॉडची मजेदार कमेंट
2 U-19 World Cup Ind vs Pak : उपांत्य सामन्याआधी पाक सलामीवीराचं मोठं विधान, म्हणाला…
3 धोनी मर्सिडीज असेल तर मनिष पांडे अल्टो !
Just Now!
X