03 March 2021

News Flash

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रजनीकांत यांना दिल्या ट्विटरद्वारे शुभेच्छा, म्हणाले…

आज रजनीकांत यांचा ७० वा वाढदिवस आहे.

सुपरस्टार रजनीकांत यांचा आज १२ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. रजनीकांत हे ७० वर्षांचे झाले आहेत. रजनीकांत यांनी त्यांची स्टाइल आणि अभिनयाने अनेकांच्या मनात घर केले आहे. त्यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. जगभरात त्यांचे चाहते असल्याचे पाहायला मिळते. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अनेक कलाकारापर्यंत सर्वांनीच रजनीकांत यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘प्रिय रजनीकांत तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. देव तुम्हाला सदैव निरोगी ठेवो’ या आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

जेष्ठ संगीतकार ए.आर. रहमान यांनी देखीन ट्विटरद्वारे रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतमधील लोकप्रिय अभिनेता व्यंकट प्रभू रजनीकांत यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत म्हणाले, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा.’ तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनीही रजनीकांत यांना शुभेच्छा दिल्या.

रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० मध्ये झाला आहे. आज ते ७० वा वाढदिवस साजरा करत आहेत. ७० वर्षांचे होऊनही ते चित्रपटात काम करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2020 12:11 pm

Web Title: from pm modi to great actors wishing south superstar actor rajnikant for celebrating his 70th birthday dcp 98 avb 95
Next Stories
1 Video : कोरिओग्राफर पुनितच्या लग्नात भारतीचा पतीसोबत जोरदार डान्स; नेटकरी म्हणाले….
2 सैफच्या बहिणीने शेअर केला सारा आणि अमृता सिंहचा फोटो, म्हणाली…
3 कंगनाच्या ट्विटला दिलजितचं मजेशीर उत्तर; सांगितलं पूर्ण वेळापत्रक
Just Now!
X