26 February 2021

News Flash

बॉलिवूडवर शोककळा; फुकरे चित्रपटातील अभिनेत्याचं निधन

प्रसिद्ध अभिनेता काळाच्या पडद्याआड

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता ओलानोकियोटन गॉलाबो ल्यूकस याचं निधन झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो आजारी होता. शनिवारी रात्री उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. ओलानोकियोटनच्या निधनामुळे बॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. फरहान अख्तरसह अनेक नामांकित कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

‘फुकरे’ या चित्रपटामुळे ओलानोकियोटन खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला होता. या चित्रपटात त्याने बॉबी ही महत्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याने केलेल्या अभिनयाची प्रचंड स्तुती करण्यात आली होती. फरहान अख्तरनं ट्विटच्या माध्यमातून त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. “एक गुणी कलाकार आज आपण गमावला. ओलानोकियोटन तुझी कायम आठवण येत राहील.” अशा आशयाचं ट्विट करुन त्याने आपलं दु:ख व्यक्त केलं. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2021 12:34 pm

Web Title: fukrey actor olanokiotan gbolabo lucas dies mppg 94
Next Stories
1 Drugs Case : दिया मिर्झाच्या एक्स मॅनेजरसह करण सजनानीची न्यायालयीन कोठडीत रवानगी
2 सोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड?
3 प्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ? पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा
Just Now!
X