News Flash

‘फुकरे रिटर्न्स’ला यश मिळूनही का भडकली रिचा?

तिचा राग अनावर होण्याचे कारण आहे...

richa
रिचा चड्ढा

अभिनेत्री रिचा चड्ढा सध्या ‘फुकरे रिटर्न्स’ या चित्रपटामुळे बरीच चर्चेत आहे. दीर्घकालीन प्रतिक्षेनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘फुकरे रिटर्न्स’ चित्रपटाच्या टीमने सध्या प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मनं जिंकली आहेत. किंबहुना चित्रपटाची टीम प्रदर्शनानंतरही शक्य त्या सर्व परीने त्याची प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न करत आहेत. विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. पण, या साऱ्यामध्ये अभिनेत्री रिचा चड्ढाचा राग मात्र अनावर झाला आहे. तिचा पारा चढण्यामागचे कारण म्हणजे ‘एअर इंडिया’.

गेल्या काही दिवसांपासून, बऱ्याच प्रवाशांनी एअर इंडियाच्या सेवेविषयी तक्रारी केल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यातच आता अभिनेत्री रिचा चड्ढाचाही समावेश झाला आहे. चंडीगढहून मुंबईला येण्यासाठी रिचाने एअर इंडियाचा पर्याय निवडला. दुपारी साडेतीन वाजता तिचे फ्लाइट होते, ज्याने मुंबईत आल्यावर रात्री आठच्या सुमारास तिला चित्रपटाच्या ‘सक्सेस पार्टी’त सहभागी व्हायचे होते. पण, ऐनवेळी फ्लाइट रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले.

वाचा : ‘जब वी मेट’मधील गीतचा प्रियकर आठवतोय…

आखलेले सर्व बेत फसल्यामुळे रिचाला प्रचंड राग आला आणि तिने ट्विरच्या माध्यमातून एअर इंडियावरील चीड व्यक्त केली. ‘एअर इंडिया, मला कसेही करुन चंदीगढमधून बाहेर काढा. तुम्ही साडेतील वाजताचे विमान रद्द केले, मला चित्रपटाच्या सक्सेस पार्टीसाठी जायचे आहे’, असे ट्विट तिने केले. रिचाचे हे ट्विट पाहून एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने रिचाला चंदीगढ येथील ऑफिसशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला.
त्यानंतर मात्र रिचाचा राग अनावर झाला आणि तिने एकामागोमाग एक ट्विट करत एअर इंडियावर नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. ‘फ्लाइट रद्द झाल्याचे तुम्ही आधी का कळवले नाही?’, असा प्रश्नही तिने उपस्थित केला. त्यानंतर रिचाच्या ट्विटला उत्तर देत एअर इंडियातर्फे तिची माफी मागण्यात आली. त्यानंतर पुन्हा रिचाने लिहिले, ‘जर तुम्हाला खरंच झाल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करायची असेल तर, माझ्यासाठी खासगी विमानाची सोय करुन द्या.’ एअर इंडियाच्या या गोंधळामुळे ‘फुकरे’ फेम भोली पंजाबन रौद्र रुपात दिसली अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2017 6:14 pm

Web Title: fukrey returns fame bollywood actress richa chaddha slams air india airlines for flight cancel tweets
Next Stories
1 किंग खानला ‘जब हॅरी मेट सेजल’चा दुसऱ्यांदा फटका?
2 ‘१९२१’ सिनेमाचा ट्रेलर पाहून तुम्हीही घाबराल
3 Bigg Boss 11: हितेनने विश्वासघात केल्यामुळे अर्शीचा पारा चढला
Just Now!
X