News Flash

चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी रिलेशनशिपमध्ये असल्याचे नाटक का करु, रिचाचा सवाल

काहीही न जाणता उगाचच तर्क लावले जातात

रिचा चड्ढा,अली फजल

काही महिन्यांपूर्वीच ‘फुकरे फेम’ अभिनेता अली फजल आणि अभिनेत्री रिचा चड्ढा या दोघांनीही आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचे स्पष्ट केले होते. इतकेच नव्हे तर, ‘व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल’ Venice Film Festival मध्येही या दोघांच्या नात्याची एक वेगळी बाजू पाहायला मिळाली होती. पण, फुकरे रिटर्न्स या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर अली आणि रिचा रिलेशनशिपमध्ये असल्याचा कांगावा करत असल्याचेच अनेकांचे मत होते. त्याविषयीच आता रिचाने एका मुलाखतीत काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत याविषयी सांगताना रिचा म्हणाली, ‘फक्त चित्रपटासाठीच मी आणि अली रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होण्याची बाब फारच दु:खदायक होती.’ मला चित्रपटाच्याच प्रसिद्धीसाठीच रिलेशनशिपमध्ये असल्याचा दिखावा करायचा असता कर, मी ते चित्रपटातील ‘चूचा’ म्हणजेच वरुण शर्मासोबत प्रेमाचा दिखावा केला असता, असे तिने स्पष्ट केले. चित्रपटाचीच प्रसिद्धी करण्यासाठी प्रेमप्रकरणांच्या अफवा पसरवायच्या असत्या तर त्यासाठी थेट सहकलाकारासोबतच आपण प्रेमाचे नाटक केले असते, असे ती म्हणाली. अली आणि आपण कधीच रिलेशनशिपविषयी खुलेपणाने बोलण्याला प्राधान्य न दिल्याचेही तिने सांगितले. ‘नात्याविषयी कळताच बरेचजण आपले तर्क लावण्यास सुरुवात करतात आणि अवाजवी प्रतिक्रिया देतात. निदान आतातरी त्यांना सर्व स्पष्ट होईल’, असे ती म्हणाली.

VIDEO : जीममधील विद्युतचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

अली आणि रिचा बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखत आहेत. त्यांचे प्रेमप्रकरण आता सर्वांनाच ठाऊक झाले असून, आता मात्र त्याविषयी अली आणि रिचानेही उघडपणे बोलण्यास प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळते आहे. विविध कार्यक्रमांमध्येही त्या दोघांना एकमेकांविषयी प्रश्न विचारले असता ते उत्तरं देण्यास नकार देत नाहीत. त्यामुळे बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडप्यांच्या यादीत आता रिचा आणि अलीच्या नावाचा समावेश झाला आहे, असे म्हणायला हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 5:02 pm

Web Title: fukrey returns fame bollywood actress richa chadha said about rumors of faking romance with actor ali fazal
Next Stories
1 करिश्माने शेअर केला तैमुरचा क्यूट फोटो
2 Hichki Trailer Out : राणीच्या ‘हिचकी’ची पहिली झलक
3 २०१८ मध्ये मिलिंद सोमण करणार लग्न?
Just Now!
X