22 October 2020

News Flash

Viral Video : सनी देओलच्या डान्सचा हा व्हिडियो पाहिलात? 

पाहून तुम्हालाही येईल नक्कीच हसू

आपल्याकडे कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे डान्स तर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. नुकताच असाच एक व्हिडियो व्हायरल झाला आहे. प्रसिद्ध डिजे स्नेकचे नवे गाणे मॅजेंटा रिडिम लोकांना चांगलेच आवडले आहे. पण विचार करा या गाण्यावर बॉलिवूड अभिनेता सनी देओल नाचला तर? चित्रपटसृष्टीत अॅक्शन हिरो म्हणून प्रसिद्ध असलेला सनी देओल डान्स कऱण्यासाठी म्हणावा तितका प्रसिद्ध नाही. मात्र त्याच्या डान्सचा एक व्हिडियो काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये सनी देओल डिजे स्नेकच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. पण या व्हिडियोचे सत्य हे आहे, की सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडियो एडीट करुन अपलोड करण्यात आला आहे. सध्या तंत्रज्ञान विकसित झाल्याने अशाप्रकारचे एडिटींग करणे अगदी सहज शक्य असते.

मॅजेंटा रिडिमच्या या तालावर सनीचा डान्स पाहून तुम्हालाही पोट धरुन हसायला लावेल असा आहे. यु-ट्यूबवर या व्हि़डियोला मोठी पसंती मिळत आहे. अवघ्या ४१ सेकांदाचा हा व्हिडियो जवळपास २ लाख लोकांनी पाहिला आहे. तर सहा हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे आणि अनेकांनी तो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअरही केला आहे. त्यामुळे तुम्ही जर हा व्हिडियो पाहिला नसेल तर तुम्हीही त्याचा आनंद घ्या. या डान्समधील स्टेप्स अजय या एका १९९६ मध्ये आलेल्या चित्रपटातील आहेत. छम्मक छल्लो जरा धीरे चलो या गाण्यावर तो आणि जुही चावला डान्स करत आहेत. त्यावर दुसरे गाणे लावून एडिट करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2018 1:02 pm

Web Title: funny video of sunny deol dance on magenta riddim
Next Stories
1 VIRAL VIDEO : पुतिन यांना घाबरल्या मेलानिया ट्रम्प?
2 विश्वविजेत्या फ्रान्सचा पोग्बा शोधतोय ‘अच्छे दिन’, काँग्रेसने उडवली खिल्ली
3 ‘Idiot’ टाईप केल्यानंतर गुगलवर दिसतेय ‘या’ नेत्याची प्रतिमा
Just Now!
X