28 September 2020

News Flash

‘फ्युचर’ की ‘फिगर’; दीपिकाला कशाची वाटते भीती?

सोनाली कुलकर्णीने दीपिकाला विचारला प्रश्न..

दीपिका पदुकोण

आशिया खंडातील सर्वांत सेक्सी महिलांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला ‘फ्युचर’ की ‘फिगर’ यापैकी कशाची भीती वाटते असा प्रश्न विचारण्यात आला. दीपिका लवकरच ‘छपाक’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवाल यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून दीपिका यात लक्ष्मीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीनिमित्त ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत दीपिका समाजातील सौंदर्याच्या परिभाषांवर मनमोकळेपणाने व्यक्त झाली.

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिची ही मुलाखत घेतली होती. या मुलाखतीच्या शेवटी सोनालीने तिला प्रश्न विचारला की, तुला कशाची भीती वाटते, ‘फ्युचर’ की ‘फिगर’? यावर तिने क्षणाचाही विलंब न करता बेधडकपणे उत्तर दिलं की, ‘मी यापैकी कशालाच घाबरत नाही.’ ‘छपाक’ या चित्रपटात अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या तरुणीची भूमिका साकारण्यासाठी दीपिकाने प्रोस्थेटिक मेकअपचा वापर केला होता. “तो चेहरा आरशात पाहिल्यानंतर मला जराशीही भीती वाटली नव्हती, कारण मनातून मी तिच दीपिका आहे हे मला माहित होतं आणि चित्रपटाची कथासुद्धा अशीच आहे,” असं तिने म्हटलं.

आणखी वाचा : अक्षयसाठी ‘गुड न्यूज’ तर सलमानसाठी ‘बॅड न्यूज’!

सुंदरतेची परिभाषा मांडण्यासाठी आपल्या समाजात एक चौकट ठरलेली आहे, असं म्हणत तिने मनाच्या सौंदर्यासमोर शारीरिक सौंदर्य दुय्यम ठरतं याकडे लक्ष वेधलं.

मेघना गुलजार दिग्दर्शित ‘छपाक’ हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये दीपिकासोबत अभिनेता विक्रांत मेस्सीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2019 12:41 pm

Web Title: future or figure what deepika padukone is scared about ssv 92
Next Stories
1 आपली वाटचाल हिंसक, आपण पाकिस्तान होत चाललोय – भालचंद्र नेमाडे
2 अक्षयसाठी ‘गुड न्यूज’ तर सलमानसाठी ‘बॅड न्यूज’!
3 अथिया-के.एल राहुलच्या फोटोवर सुनील शेट्टीने दिली ‘ही’ कमेंट
Just Now!
X