04 March 2021

News Flash

‘म्हणून आता द्राक्ष आंबट लागतायत’, गजेंद्र चौहान यांचा मुकेश खन्नावर निशाणा

त्यांनी एका मुलाखतीमध्ये हे व्यक्तव्य केले आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कॉमेडी शो म्हणजे ‘कपिल शर्मा.’ या शोचा सूत्रसंचालक कपिल शर्मा आणि त्याची संपूर्ण टीम प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करत आहे. तसेच या शोमध्ये हजेरी लावणारे पाहुणे कलाकार शो आणखी रंजक करतात. नुकताच या शोमध्ये महाभारत मालिकेतील कलाकार पाहुणे म्हणून पोहोचले होते. त्यामध्ये नीतीश भारद्वाज, फिरोज खान, गजेंद्र चौहान, पुनीत इस्सर आणि गूफी पटेल यांचा समावेश आहे. पण मुकेश खन्ना यांनी शोमध्ये जाण्यास नकार देत शोवर टीका केली. आता गजेंद्र चौहान यांनी मुकेश खन्ना यांना सुनावले आहे.

नुकताच गजेंद्र चौहान यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी मुकेश खन्ना यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘मला वाटतं मुकेश खन्ना यांना द्राक्ष आंबट लागत आहेत. कारण त्यांना ती द्राक्ष खायला मिळाली नाहीत म्हणून करोडो लोकं हा कार्यक्रम बघत आहेत आणि फालतू असल्याचं म्हणत आहेत’ असे म्हटले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gajendra Chauhan (@imgajji) on

आणखी वाचा: …म्हणून मी कपिल शर्माच्या शोमध्ये जात नाही- मुकेश खन्ना

गजेंद्र यांनी पुढे म्हटले की शोमध्ये पुरुष महिलांचे कपडे परिधान करतात. पण ते हे विसरले की महाभारत मालिकेत अर्जुनाने एका मुलीचे कपडे परिधान करुन सीन दिला होता. मग त्यांनी देखील शो सोडायला हवा होता का?. त्यानंतर गजेंद्र यांनी मुकेश खन्ना हे म्हणाले होते की त्यांनी शोमध्ये जाण्यास नकार दिला होता. पण हे सत्य नाही. मला जितकी माहिती आहे त्याप्रमाणे त्यांना बोलवण्यात आले नव्हते असे म्हटले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2020 4:41 pm

Web Title: gajendra chauhan slams mukesh khanna avb 95
Next Stories
1 अनुरिता सांगतेय ‘परिवार’ सीरिजमध्ये काम करण्याचा अनुभव
2 सुव्रत जोशीनं घेतला डबिंगचा क्रेझी अनुभव
3 लॉकडाउनमध्ये शूट झालेल्या अक्षय कुमारच्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
Just Now!
X