‘गेम ऑफ थ्रोन्स’मध्ये ज्यावेळी नेड स्टार्कची मान शरिरापासून वेगळी झाली, तेव्हापासून या सीरिजने लोकांच्या मनात आपले स्थान पक्क केले. या शोने आधीच स्पष्ट केले होते की ज्या व्यक्तिरेखा लोकांच्या पसंतीस उतरतात त्यांना स्क्रिनवर जिवंत ठेवण्यात त्यांना काहीही स्वारस्य नसते. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ची टीम त्या व्यक्तिरेखांना एखाद्या मोहऱ्याप्रमाणे वापरते.

सनी लिओनीच्या गाण्यावर क्रिस गेलने केला डान्स आणि म्हटले…

ते त्यांच्या लक्ष्यावरती जास्तीत जास्त भर देतात आणि पुढील क्षणात त्यांना जमीनदोस्तही करतात. त्यामुळेच प्रेक्षकांना ही सीरिज सर्वात जास्त आवडली आहे. या सीरिजमध्ये कोणावरच दया, माया दाखवली जात नाही. समिक्षकांनी हा शो हिंसा आणि नग्नता यांना प्रोत्साहन देणारा शो असल्याची टीकाही केली होती.

या शोमध्ये मोठ्या प्रमाणात राजकारण दाखवण्यात आलं आहे. मरणाच्या दारावर असतानाही कसा रोमान्स केला जातो याचीही अनोखी पद्धत या शोमध्ये यातून दिसते. शोच्या मागील भागात भाऊ आणि बहिणीमध्ये कसे अफेअर होते ते दाखवण्यात आले होते तर दुसरीकडे वडीलच आपल्या मुलींवर कसा बलात्कार करतो हेही दाखवण्यात आले होते. हा सर्व प्रकार प्रेक्षकांना धक्का देऊन जातो.

मालिकेत पुढे काय घडेल याची पुसटशीही कल्पना प्रेक्षकांना येत नाही हेच या मालिकेचे यश आहे. प्रत्येक भागात तुम्हाला नवीन काही पाहायला मिळतं ज्याची कल्पनाही तुम्ही कधी केलेली नसते.

या शोच्या सातव्या सिझनचा प्रिमिअर १६ जुलैला रात्री ९ वाजता झाला. सातव्या सिझनचे नाव ‘ड्रॅगन स्टोन’ असे आहे. भारतात जे प्रेक्षक या शोचे चाहते आहेत त्यांना या सिझनचा पहिला भाग १८ जुलैला स्टार वर्ल्ड आणि स्टार वर्ल्ड एचडीवर रात्री ११ वाजता पाहता येणार आहे.
हॉटस्टारवरही या मालिकेचे भाग सकाळी ७.३० वाजता पाहता येणार आहेत. गेल्या सिझनमध्ये असे अनेक प्रश्न आणि रहस्य आहेत जी अनुत्तरीत राहिली होती. त्यामुळे या सिझनमध्ये त्यांची उत्तरं मिळतील अशी आशा प्रेक्षक करत आहेत.