01 October 2020

News Flash

गेम ऑफ थ्रोन्समध्ये उच्चारलेल्या प्रत्येक शब्दाला कोट्यवधींचा भाव

जगातील सर्वात जास्त मानधन देणारी मालिका

‘गेम ऑफ थ्रोन्स’ची लोकिप्रयता जंगलात जसा वणवा पेटावा त्या वेगाने जगभरात पसरली आहे. सध्या याचे सातवे आणि शेवटचे सत्र सुरू असल्यामुळे चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. आजवरचे सगळे जुने विक्रम मोडून नवे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या या मालिकेने जगातील सर्वात जास्त मानधन देणारी मालिका म्हणून एक नवा लौकिक आपल्या नावावर करून घेतला आहे. दृश्य माध्यमांत कलाकाराला मानधन देताना त्याचा अनुभव, अभिनयाची शैली, लोकप्रियता आणि व्यक्तिरेखा लक्षात घेतली जाते. परंतु ‘गेम ऑफ थ्रोन्स’ने वेगळ्याच प्रकारे मानधन देण्यास सुरुवात केली. ‘आयपीएल’ क्रिकेट स्पर्धेत खेळाडूंना मिळणारी रक्कम निश्चित करताना इतिहासातील कामगिरी न पाहता त्यांची सद्य:स्थिती लक्षात घेतली जाते. त्यांनी केलेल्या धावांची सरासरी, स्ट्राईक रेट आणि जिंकवलेले सामने यावरून त्यांचे मानधन निश्चित केले जाते. या मालिकेने पैसे देण्याची हीच पद्धत अवलंबली आहे. या कार्यक्रमात कोणती व्यक्तिरेखा किती लोकप्रियआहे? प्रेक्षक कोणत्या कलाकाराचे संवाद किती वेळा पाहतात? याची आकडेवारी काढून प्रत्येक कलाकाराचा एखाद्या वस्तूप्रमाणे बाजारभाव ठरवला जातो आहे. आणि त्या अनुषंगाने त्याने उच्चारलेल्या प्रत्येक शब्दासाठी त्या कलाकाराला पैसे दिले जातात. या पाश्र्वभूमीवर विचार करता मालिकेतील काही लोकप्रिय अभिनेत्यांना मिळणाऱ्या मानधनाचे आकडे पाहून थक्क व्हायला होते. नेटली डॉरमर, मेसी विलियम्स, सेन बीन, सोफी टर्नर, रिचर्ड मॅडॅन, इयान ग्लेन या कलाकारांनी उच्चारलेल्या प्रत्येक शब्दासाठी २ लाख ९९ हजार रुपये मिळतात. प्रत्येक भागात ५६० शब्द या अभिनेत्यांनी उच्चारले आहेत. याचा अर्थ प्रत्येक भागामागे १६.७ कोटी रुपये त्यांना दिले जातात. पहिल्या सहा सत्रांमधील ६० भागांतून या मंडळींनी १००कोटी २ लाख रुपये कमावले आहेत. या पद्धतीने मालिकेतील सर्वात लोकप्रिय कलाकारांनी अनुक्रमे लीना हेडी २०० कोटी ३ लाख ८० हजार, निकोलाज कोस्टर वाल्डा २०० कोटी ९५ लाख २०हजार, एमिलिया क्लार्क ३०० कोटी ३४ लाख ८० हजार, टीरियन लॅनिस्टर हे पात्र साकारणारा पीटर डिंक्लेज ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधील सर्वात लोकप्रिय कलाकार आहे. याने पहिल्या ६ सत्रात ६ कोटी ६० लाख प्रतिशब्द या दराने ३०० कोटी ९६ लाख रुपयांची कमाई केली आहे.

‘एमिलिया क्लार्क’

 

‘इयान ग्लेन’

 

‘नेटली डॉरमर’

 

‘निकोलाज कोस्टर वाल्डा’

 

‘पीटर डिंक्लेज’

 

‘सोफी टर्नर’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2017 12:10 am

Web Title: game of thrones season 7 natalie dormer iain glen peter dinklage emilia clarke hollywood katta part 26
टॅग Hollywood Katta
Next Stories
1 अवघ्या २०व्या वर्षी मादाम तुसाँ संग्रालयात या अभिनेत्रीचा पुतळा
2 पूजा भट्ट करणार आलियाच्या चित्रपटाचं दिग्दर्शन?
3 ‘मुल्क’मध्ये ऋषी कपूरच्या सूनेच्या भूमिकेत तापसी
Just Now!
X